TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 31 ऑगस्ट 2024 : ABP Majha
TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 31 ऑगस्ट 2024 : ABP Majha
शिवाजी महाराज पुतळा कोसळल्याप्रकरणी माफी मागतानाच पंतप्रधान मोदींची काँग्रेसवर टीका. सावरकरांचा वारंवार अपमान करणाऱ्यांनी कधी माफी मागितली नाही. पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल.
छत्रपती शिवराय आमचे आराध्य दैवत, शिवरायांच्या पायावर नतमस्तक होऊन माफी मागतो, शिवराय, शिवभक्तांची पंतप्रधानांनी मागितली माफी.
शिवरायांच्या नावाने राजकारण करणाऱ्या पेशवाईने पुन्हा शिवरायांचा अपमान केला, माफी मागितल्याने प्रश्न सुटणार नाही, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका
निर्भीडपणे माफी मागायला पंतप्रधानांनी कच खाल्ली. पृथ्वीराज चव्हाण यांची मोदींवर टीका. पंतप्रधानांनी जबाबदारी निश्चित करून कारवाई करावी. पृथ्वीराज चव्हाणांचं वक्तव्य.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उशिरा माफी मागितली, माफीने काही होणार नाही, विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा पंतप्रधान मोदींना टोला.
केवळ माफीवीर होऊन चालणार नाही, तर दोषींवर कारवाई करावी लागेल, मोदींच्या माफीवर रोहित पवारांची एक्स पोस्टद्वारे प्रतिक्रिया.





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
