TOP 25 News | टॉप 25 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा 06 Jully 2024 ABP Majha
रवींद्र वायकरांना कथित जोगेश्वरी भूखंड घोटाळाप्रकरणी मुंबई पोलिसांकडून क्लीन चीट, गैरसमजातून मुंबई महापालिकेकडून गुन्हा दाखल, पोलिसांचा दावा, सत्यमेव जयते, वायकरांची माझाला प्रतिक्रिया.
आता फक्त दाऊदला क्लीनचीट द्यायचं बाकी, वायकरांच्या क्लीनचीटवरुन संजय राऊतांचा घणाघात, तर महायुतीकडे गेल्यानंतर वॉशिंगमशीनमध्ये धुतलं जात, पटोलेंचा टोला.
रवींद्र वायकरांच्या क्लीनचीटवर किरीट सोमय्यांचं नो कमेन्टस, प्रकरण कोर्टात म्हणत सोमय्यांनी बोलणं टाळलं.
हिंगोलीत मनोज जरांगेंचं जंगी स्वागत, जरांगेंची १३ जुलैपर्यंत शांतता रॅली, १३ जुलैनंतर भूमिका ठरवणार..
ओबीसी आरक्षणासाठी सर्वपक्षीय नेत्यांची सोमवारी बैठक, ४५ पक्षांच्या नेत्यांना बैठकीचं निमंत्रण.
विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाला दिलेल्या ११ कोटी रुपयांच्या बक्षीसावरुन विरोधकांचा हल्लाबोल, राज्याच्या तिजोरीत खडखडाट, मग बक्षीस देण्याची गरज काय? विरोधकांचा सवाल.
पुण्यात कायद्याचं भय उरलं नाही, ड्रंक अँड ड्राइवच्या कारवाईदरम्यान महिला वाहतूक पोलिसाला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक...
बीडमध्ये धावत्या दुचाकीवरुन सेल्फी घेणं पडलं महागात, एकाचा मृत्यू, अपघाताची दृश्य कॅमेऱ्यात कैद.
नीटचं कौन्सिलिंग अनिश्चित काळासाठी लांबणीवर...पेपरफुटीच्या घटनानंतर सरकारचा निर्णय
सोमवारी राहुल गांधी मणिपूरला जाणार, लोकसभेचे विरोधी पक्षनेते बनल्यानंतर पहिल्यादांच मणिपूर दौरा.
संत ज्ञानेश्वर माउलींच्या पादुकांचं नीरा नदीत स्नान, तर तर संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा आज बारामतीत मुक्काम