Top 25 : टॉप 25 न्यूज : 4 PM : 24 July 2024 : ABP Majha
गृहमंत्री असताना अनिल देशमुखांनी आपल्याला अनेकदा धमकावलं होतं, जळगावचे तत्कालीन एसपी प्रवीण मुंढे यांची सीबीआयसमोर कबुली
माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचे देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप, अजित पवारांसह उद्धव आणि आदित्य ठाकरे, अनिल परब यांना खोट्या आरोपात गोवण्यासाठी दबाव टाकल्याचा दावा
महायुतीमधील केवळ भाजपचे उमेदवार पाडणार, मनोज जरांगेंचं आणखी एक राजकीय वक्तव्य
मनोज जरांगेंच्या मनातला फडणवीसांबद्दलचा द्वेष पुन्हा समोर, राज्याच्या गृहमंत्र्यांवर अतिशय खालच्या पातळीवर टीका...
मला जेलमध्ये पाठवून मारण्याचा फडणवीसांचा प्लॅन, जरांगेंचा आरोप, तर जरांगेंनाच जेलमध्ये जाण्याची हौस आलीये, प्रवीण दरेकरांचा प्रत्यारोप
मनोज जरांगेंच्या मागे राज्यातला मोठा आणि जबाबदार नेता, प्रवीण दरेकरांचं सूचक वक्तव्य
(('जरांगेंच्या मागे मोठा, जबाबदार नेता'))
महाविकास आघाडीचं जागावाटपाचं सूत्र ठरलं, विद्यमान जागा त्या-त्या पक्षाकडेच राहणार, महायुतीच्या मतदारसंघांमध्ये ताकद पाहून उमेदवार ठरवणार