TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 05 PM : 11 June 2024 : ABP Majha
नागपूरचे 82 वर्षीय पुरुषोत्तम पुट्टेवार यांच्या अपघाती हत्या प्रकरणात त्यांची सून अर्चना पुट्टेवारच मास्टरमाइंड. अर्चना पुट्टेवार यांनीच कुटुंबातील ड्रायव्हर सार्थक बागडेला दिली होती सासऱ्यांच्या हत्येची सुपारी. पोलीस तपासात झालं स्पष्ट.
पाच महिन्यांच्या बाळाला जमिनीवर आपटून मारले. नराधम बापाला अटक. उरण येथील घटना. पती-पत्नीत कडाक्याचं भांडण झाल्यानं पती खुशीरामनं पत्नीच्या मांडीवर झोपलेल्या पाच महिन्यांच्या रुहीला खेचून जमिनीवर आपटलं.
ठाण्यातील फ्लॉवर व्हॅली जवळ, रुणवाल नगर, ईस्टर्न एक्सप्रेस हायवे येथील साधना विला सोसायटी बाजूला असलेलं होर्डिंग धोकादायक स्थितीत. होर्डिंग कॉन्ट्रॅक्टरला त्वरित होर्डिंग काढण्याचे आदेश.
भीक मागून पैसे आणण्यासाठी मद्यपी पित्याने स्वतःच्या सहा वर्षांच्या मुलाला दिले लोखंडी सळईने चटके. जालना शहरातील मंगळ बाजार भागातील घटना. मुलावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू.
२०२१ ते मे २०२४ दरम्यान राज्यात २ लाख ३५ हजार सायबर तक्रारी, तीन वर्षात राज्यात सर्वाधिक सायबर तक्रारींची नोंद मुंबईत, ७० हजार ९०४ सायबर क्राईमची मुंबईत नोंद झाल्याची माहिती.
आता सॅटेलाईट करणार टोलवसुली, दोन वर्षांत लागू करणार ‘ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टिम’ रस्ते वाहतुकीचा टोल वसूल करण्यासाठी सध्या वापरात असलेली ‘फास्टॅग’ची व्यवस्था लवकरच रद्द होणार.
आता बोटीत बसून घेता येणार वाघांचं दर्शन. नागपूरातील पेंच व्याघ्र प्रकल्पात जून महिन्यातील तिसऱ्या आठवड्यात बोट जंगल सफारीला होणार सुरुवात.