Top 25 : टॉप 25 न्यूज : 07 PM : राज्यातील महत्त्वाच्या बातम्या : 30 सप्टेंबर 2024 : ABP Majha
समृद्धी महामार्गाचं लोकार्पण नव्या सरकारच्या काळात होण्याची शक्यता, मुंबई-नाशिक महामार्गावर आमणे इंटरचेंजजवळ रस्त्याचं काम अपूर्ण, अपूर्ण कामामुळे लोकार्पण लांबणीवर गेल्यांची माहिती.
भंडाऱ्यातील राष्ट्रवादीचे आमदार राजू कारेमोरे यांची ऑडिओ क्लिप व्हायरल, पालिका महिला मुख्याधिकाऱ्याला धमकावल्याचं क्लिपमधून समोर, महिला मुख्याधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे, म्हणून कठोर भाषा, आमदारांचा खुलासा.
सिंधुदुर्गच्या जिल्हा परिषद बांधकाम विभागात राडा, ठाकरे गटाच्या नेत्यांकडून ठेकेदाराच्या बॉडीगार्डना मारहाण, पंचायत समिती सावंतवाडीच्या इमारत बांधकाम ठेकेदारीवरून मारहाण झाल्याची माहिती.
बारामतीच्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या 69 व्या सर्व साधारण सभेत गोंधळ, भाषणावेळी सभासद माकड म्हंटल्यामुळे गोंधळ झाल्याची माहिती, दोन गटाच्या वादात पोलिसांचा हस्तक्षेप.
अटल सेतूहून समुद्रात उडी घेत एकाचा आत्महत्येचा प्रयत्न, कामावरील मानसिक तणावातून सुशांत चक्रवर्तीनं समुद्रात उडी टाकल्याची पोलिस सूत्रांची माहिती.
बीड शहरात मोटारसायकल चोरीच्या घटनेत वाढ, पत्रकार सुभाष चौरेंची सचिन मुळुक यांच्या कार्यालयाबाहेर उभी केलेली दुचाकी ३३ सेकंदात लंपास, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद .
आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत पाठोपाठ रोइंग पटू दत्तू भोकनळ सरकार विरोधात न्यायालयात याचिका दाखल करणार, दत्तू यांनी २०१६ च्या ऑलम्पिकमध्ये देशाचं प्रतिनिधित्व केलं होतं, 2017 ला नोकरीसाठी अर्ज करुन ही शासनाकडून दखल नाही.
नांदेडच्या हदगाव तालुक्यातील मनाठामध्ये लाडक्या बहिण योजनेचे पैसे पुरुषाच्या खात्यावर, सीएससी केंद्र चालकाकडून कागदपत्रांची अफरातफर करुन 37 जणांची फसवणूक, जिल्हा प्रशासनाकडून चौकशी सुरु.