TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 6:30 PM : 03 June 2024 : ABP Majha
TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 6:30 PM : 03 June 2024 : ABP Majha २० मे रोजी मतदान सुरू असताना पत्रकार परिषद घेतल्याबाबत उद्धव ठाकरेंवर कारवाई करा, केंद्रीय निवडणूक आयोगाचे राज्य निवडणूक आयोगाला आदेश, कोण कुणावर कारवाई करणार ते उद्या दुपारपर्यंत कळेल, संजय राऊतांचा पलटवार
निकालानंतर मोदींसोबत जाण्याबद्दल उध्दव ठाकरेंच्या कुटुंबाचं एकमत झालंय, रवी राणा यांचा खळबळजनक दावा...
छगन भुजबळ महायुतीमध्ये की मविआसोबत ते उद्या संध्याकाळी सांगतो, जयंत पाटील यांचं सूचक वक्तव्य
भाजप विधानपरिषदेच्या तीन जागा लढवणार, कोकण पदवीधरमध्ये निरंजन डावखरे विरूद्ध अभिजीत पानसे तर मुंबई पदवीधरमधून किरण शेलार विरूद्ध अनिल परब, महायुतीत कोकण पदवीधरवरून तीन तिघाडा
लोकसभा निकालांची देशभर उत्सुकता शिगेला, मतमोजणीसाठी देशभर यंत्रणा सज्ज...
एक्झिट पोलच्या विरूद्ध निकाल लागेल, इंडिया आघाडीला सत्ता मिळेल, सोनिया गांधींना विश्वास
मनोज जरांगेंच्या उपोषणाला अंतरवली सराटीच्या गावकऱ्यांचाच विरोध...गावात आणि परिसरात जातीय सलोखा बिघडत असल्याचं कारण...परवानगी देऊ नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन...