TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर : 18 August 2024 : ABP Majha
महायुतीला गालबोट लावणाऱ्यांना भाजपने ताकीद द्यावी, काळे झेंडे दाखवल्यानंतर सुनील तटकरेंची कठोर भूमिका
जुन्नरमध्ये भाजपच्या आशा बुचके आणि कार्यकर्त्यांकडून अजित पवारांना काळे झेंडे, पर्यटनाच्या बैठकीत डावलल्यानं कार्यकर्ते आक्रमक...
पैठण तालुक्यातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत बिस्कीटातून विषबाधा झालेल्या ७ मुलांची प्रकृती खालावली, उपचारासाठी संभाजीनगरला हलवलं..अडीचशे विद्यार्थ्यांना डिस्चार्ज...
नंदुरबारमध्ये कारचालकाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू, अनियंत्रित कारने चौघांना उडवलं, दोघे ठार..
अजित पवारांसोबत नाइलाजानं गेलो, शरद पवारच माझे नेते, माजी मंत्री राजेंद्र शिंगणेंचं वक्तव्य..जिल्हा बँकेच्या अडचणीमुळं दादांसोबत जावं लागल्याची कबुली..
दंगलीनं कुणाचाही फायदा होत नाही, नाशिकचा विकास थांबेल, छगन भुजबळांनी करुन दिली जाणीव...नाशिकला दंगलीचं शहर म्हणून पुढं आणू नका असं आवाहन..
महाविकास आघाडीला १७५ ते १८० जागा मिळतील, संजय राऊतांनी वर्तवला अंदाज, राष्ट्रवादी आणि शिवसेना सोडून गेलेले अनेक जण परतण्यासाठी इच्छुक असा दावा..
लोक मुख्यमंत्रीपदाचा चेहरा बघून मतदान करतात, संजय राऊतांची उद्धव ठाकरेंसाठी बॅटींग सुरुच... अनिल देशमुखांसोबत राऊतांची चर्चा..
सोशल मीडियासाठी शिवसेनेचा नवा चेहरा,
राहुल कनाल यांच्या खांद्यावर जबाबदारी, सोशल मीडिया राज्यप्रमुख पदी वर्णी
पंढरीच्या विठूरायाचं दर्शन होणार आणखी सुलभ, दर्शन मंडपासाठी ११० कोटींच्या आराखड्याला मंजुरी..
प्लास्टिकच्या तांदूळ, साखरेनंतर आता सिमेंटचा लसूण, अकोल्यात फेरीवाल्यानं विकला लसणाच्या नावाखाली सिमेंटचा गोळा...