(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Top 100 : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : ABP Majha : 16 Sept 2024
Top 100 : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : ABP Majha : 16 Sept 2024
लालबागच्या राजाच्या राजेशाही विसर्जन मिरवणुकीची जोरदार तयारी सुरु, पूर्व तयारीच्या पार्श्वभूमीवर लालबागच्या राजाची चरणस्पर्श रांग आजपासून बंद, तर मूखदर्शनाची रांगही रात्री १२ पासून बंद
सिद्धिविनायक मंदिरात बाप्पाच्या चरणी अर्पण झालेल्या सोन्याच्या अलंकाराचा लिलाव, आज सकाळी ११ ते ५ या वेळेत लिलाव होणार.
गणेश विसर्जनासाठी मुंबई महानगरपालिका सज्ज, मूर्तींच्या विसर्जनासाठी दोनशे चार कृत्रिम तलावांची निर्मिती, तर भाविकांच्या सेवेसाठी १२ हजार अधिकारी आणि कर्मचारी तैनात.
पुण्यात विसर्जन मिरवणुकीत उच्चक्षमतेचे ध्वनीवर्धक वापरल्यास यंत्रणा जप्त होणार, ‘डीजें’ विरुद्ध पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा कारवाईचा इशारा.
विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांकडून अधिसूचना जारी, जून्या पुलांवर एका वेळी १०० नागरिकांना आणि मिरवणूक थांबवण्याला बंदी, तसेच ध्वनिक्षेपकाचा वापर करु नये, पोलिसांच्या सूचना.