(Source: ECI/ABP News/ABP Majha)
TOP 100 : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 10 AM : टॉप 100 न्यूज : 31 May 2024 : ABP Majha
मुंबईत मध्य रेल्वेवर महामेगाब्लॉक, ठाण्यात प्लँटफॉर्म नंबर ५ आणि ६ च्या रुंदीकरणासाठी काल रात्रीपासून ६३ तासांचा महामेगाब्लॉक.. तर सीएसएमटी स्थानकावर आज रात्रीपासून ३६ तासांचा ब्लॉक.. प्रवाशांचे हाल
ठाण्यातील महामेगाब्लॉकमुळे ऐन गर्दीच्या वेळी प्रवाशांचे हाल... लोकल ३० ते ४० मिनीटानं उशीरा,,, डोंबिवली, मुंब्रा, ठाणे स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी
ईस्टर्न एक्स्प्रेस वेवर प्रचंड ट्रॅफीक जॅम, महामेगाब्लॉकमुळे रस्त्यावर प्रचंड गर्दी, दीड तो दोन किलोमीटरच्या रांगा, मुलुंड ऐरोली ब्रिजवरही ट्रेलर उलटला
राज्यात पाणीटंचाईचं भीषण संकट...धरणांमध्ये केवळ २२.४३ टक्के पाणीसाठा.... तर छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वात कमी ९ टक्के पाणीसाठा
आचारसंहिता शिथील करण्यास केंद्रीय निवडणूक आयोगाचा नकार, नवी लोकसभा अस्तित्वात येईपर्यंत आचारसंहिता शिथील होणार नाही, आयोगाने फेटाळली सरकारची विनंती
कांदा उत्पादकांनी बंद पाडली लासलगावातली खासगी बाजार समिती, कांदा निर्यातशुल्काबाबत कर्नाटक, गुजरातला एक न्याय, महाराष्ट्रावर अन्याय का, शेतकऱ्यांचा सवाल
मुंबईवर पाणीसंकट, पुरवठा करणाऱ्या धरणात केवळ ८ टक्के साठा, ५ जूनपासून १० टक्के पाणीकपात
कांदा उत्पादकांनी बंद पाडली लासलगावातली खासगी बाजार समिती, कांदा निर्यातशुल्काबाबत कर्नाटक, गुजरातला एक न्याय, महाराष्ट्रावर अन्याय का, शेतकऱ्यांचा सवाल
पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाशी जुळते ब्लड ग्रुप असलेल्या तिघांचे ब्लड सॅम्पल घेतले, तिघांचा पोलिसांकडून शोध सुरू, अल्पवयीन मुलाच्या आईच्या रक्ताचे नमुनेही तपासणार
नियमांचं उल्लंघन करणाऱ्या पब आणि बार रेस्टॉरंटना दणका देणार, राज्य उत्पादन शुल्क विभागाची करडी नजर