CM Revdanda : डॉ अप्पासाहेब धर्माधिकारी यांचं काम शब्दत वर्णन करता न येण्यासारखं- मुख्यमंत्री
ज्येष्ठ निरुपणकार आणि पद्धश्री किताबाने सन्मानित डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी यांना राज्य सरकारचा सर्वोच्च महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आलाय.. यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्या रेवदंडा इथल्या निवास्थानी भेट घेतली..... दासबोध आणि श्री सद्गुरू चरित्रच्या माध्यमातून समाज घडवण्याचं कार्य आप्पासाहेब धर्माधिकारी करत आहेत... त्यांचे वडील नानासाहेब धर्माधिकारी यांच्याकडून त्यांनी हा वारसा घेतला... श्रवण बैठकांच्या माध्यमातून अधात्म आणि समाज परिवर्तनाचं कार्य गेली आठ दशकं सुरू आहे... नानासाहेब धर्माधिकारी यांनी रुजवलेल्या रोपट्याचं वटवृक्ष करण्याचं कार्य आप्पासाहेबांनी केलंय. 2019 मध्ये एबीपी माझानंही माझा सन्मान देऊन आप्पासाहेबांना सन्मानित केलंय...
महत्त्वाच्या बातम्या


















