Imtiyaz Jalil : भाजपला रोखण्यासाठी कोणत्या पक्षासोबत युती करायची, हे MIM चे प्रमुख नेते ठरवतील
शहराला जे नाव दिलंत त्या नावाप्रमाणे दर्जा औरंगाबाद शहराला मिळणार का? MIM नेते इम्तियाज जलील यांचा सवाल. तसंच जी 20 परिषदेच्या बैठकीदरम्यान आंदोलन करण्याचाही जलील यांचा इशारा. महाराष्ट्रासह देशभरात युत्या आणि आघाड्यांची तयारी सुरू असतानाच, आता एमआयएमनेही युतीबाबत सकारात्मक धोरण अवलंबलंय. देशातील कोणते पक्ष एमआयएमसोबत येतील याबाबत चाचपणी केली जाणार असल्याचं वक्तव्य इम्तियाज जलील यांनी केलंय. त्याचसोबत भाजपला रोखण्यासाठी कोणत्या पक्षासोबत युती करायची, हे एमआयएमचे संबंधित राज्यातील प्रमुख नेते ठरवतील, असंही इम्तियाज जलील म्हणालेत. एमआयएमच्या नवी मुंबईतल्या अधिवेशनादरम्यान इम्तियाज जलील यांनी ही भूमिका मांडलीय.





















