(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Thane Sankalp Dahi Handi :नववा थर लावताना गोविंदा पडला, ठाण्यातील हंडीचा थरारक क्षण
Dahi Handi 2024 Date : देशभरात दरवर्षी दहीहंडीचा (Dahi Handi 2024) उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील नवमी तिथीला दहीहंडीचा सण साजरा केला जातो. हा सण विशेषतः गुजरात, महाराष्ट्र आणि गोव्यात मोठ्या थाटात साजरा होतो. दहीहंडी ही एक प्रसिद्ध क्रीडा स्पर्धा आहे, ज्यामध्ये अनेकजण मोठ्या उत्साहाने सहभागी होतात.
दहीहंडी 2024 कधी? (Dahi Handi 2024 Date)
दहीहंडीचा सण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या नवव्या तिथीला साजरा केला जातो. यावर्षी कृष्ण जन्माष्टमी सोमवारी 26 ऑगस्ट 2024 रोजी साजरी केली जाणार आहे. तर 27 ऑगस्टला दहीहंडीचा सण साजरा होणार आहे.
दहीहंडी सण का साजरा होतो? (Why we celebrate Dahi Handi?)
धार्मिक मान्यतेनुसार, श्रावण महिन्यातील अष्टमी तिथीच्या मध्यरात्री देवकीच्या पोटी भगवान विष्णूचं रूप असलेल्या भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला. म्हणून हा दिवस संपूर्ण भारतात कृष्ण जन्माष्टमी म्हणून साजरा केला जातो. भगवान श्रीकृष्णाला लोणी खूप आवडायचं. म्हणूनच ते त्यांच्या मित्रांसह वर चढायचे आणि दह्याने भरलेलं भांडं शोधायचे. त्यामुळेच श्रीकृष्णाला माखन चोर असंही म्हटलं जातं. त्यामुळे श्रीकृष्णाच्या बालपणीच्या कारनांम्यांचं स्मरण म्हणून देशभरातील विविध राज्यांमध्ये दहीहंडीचा सण साजरा केला जातो.
जन्माष्टमी 2024 कधी आहे? (Janmashtami 2024 Date)
यंदा 26 ऑगस्टला जन्माष्टमी साजरी केली जाणार आहे. यावर्षी श्रावण कृष्ण अष्टमी तिथी 26 ऑगस्ट रोजी पहाटे 3 वाजून 39 मिनिटांनी सुरू होत आहे. 27 ऑगस्टला पहाटे 2 वाजून 20 मिनिटांनी अष्टमी तिथी संपेल.