एक्स्प्लोर
Ravindra Chavhan on Thackeray Brothers | 'म' मराठीचा नव्हे, 'म' मतांचा! ठाकरे बंधूंवर रवींद्र चव्हाणांची टीका
रवींद्र चव्हाणांनी एबीपी माझाला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये आगामी महापालिका निवडणुकांबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. महायुती म्हणून एकत्र निवडणुका लढणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यावरही त्यांनी भाष्य केले. लोकांचे लक्ष वेधण्यासाठी ठाकरे बंधू हेतुपुरस्सर एकत्र आल्याचे चव्हाण म्हणाले. "म मराठीचा नव्हे तर म मतांचा आहे" अशी टीका रवींद्र चव्हाणांनी केली आहे. येणाऱ्या निवडणुका जनतेच्या आणि कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या मर्जीने निवडणुका होणे अपेक्षित आहे. या संदर्भात देवेंद्रजी स्वतः कार्यकर्त्यांशी बोलणार आहेत. त्यानंतर आवश्यक ते निर्णय घेतले जातील. महायुतीचे तीनही नेते, देवेंद्रजी, शिंदे साहेब आणि अजित दादा हे सुज्ञ आहेत. प्रदेशाध्यक्ष म्हणून देवेंद्रजी आणि इतर सर्वजण योग्य निर्णय घेतील. निवडणुका जवळ आल्यानंतर काही पक्ष भावनिक आवाहन करतात. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा विषय हेतुपुरस्सर लोकांचे लक्ष वेधण्यासाठी केला गेला आहे. दोन ठाकरे बंधू एकत्र येणे हे माध्यमांनीही प्रयत्न केले होते. त्यांच्या मनात काय आहे हे कोणी सांगू शकत नाही. त्यामुळे हा 'म' मराठीचा नव्हे, 'म' मतांचाच आहे हे शंभर टक्के खरे आहे.
महाराष्ट्र
Shiv Sena UBT MNS Alliance Raj Uddhav Thackeray : दोन दिवसांत ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा?
Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
Municipal Corporation Election : उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागणार
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण























