Tadoba: चंद्रपुरात ताडोबा महोत्सवाचं आयोजन, व्याघ्र प्रकल्पाचे जागतिक ब्रँडिंग करण्यासाठी उपक्रम
चंद्रपुरात ताडोबा महोत्सवाची काल थाटात सुरुवात झालीय. तीन दिवस हा महोत्सव चालणार आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे जागतिक ब्रँडिंग करण्यासाठी वनविभागाने हा महोत्सव आयोजित केला आहे. पहिल्याच दिवशी देशभरातून वन्यजीव अभ्यासक आणि पर्यटन क्षेत्रातील तज्ज्ञ यांची विविध परिसंवाद परीचर्चांना उपस्थिती राहिली. या महोत्सवादरम्यान ताडोबा आणि परिसरातील वन्यजीव समित्यांना इको टुरिझमसाठीची विकास रक्कम दिली जाणार आहे. महोत्सवात तीनही दिवस वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहेत. ताडोबाचा पर्यटन आणि रोजगार विषयक समन्वय साधण्याचा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया वनमंत्री मुनगंटीवार यांनी याप्रसंगी दिली.






















