(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Surat : भारताची पहिली बुलेट ट्रेन मुंबई आणि अहमदाबाद ते दोन शहरांच्या दरम्यान धावणार : ABP Majha
भारताची पहिली बुलेट ट्रेन मुंबई आणि अहमदाबाद ते दोन शहरांच्या दरम्यान धावणार आहे, त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात निर्माण कार्य गुजरात राज्यात सुरू आहे, गुजरात मधील सुरत शहराजवळ वक्ताना याठिकाणी बुलेट ट्रेनचे कास्टिंग याड बनवण्यात आले आहे, जिथे पोचणारे एबीपी माझा पहिले चॅनेल आहे, या यार्डमध्ये कॉंक्रीटचे स्पॅन बनवण्यात येत आहेत, हे स्पॅन बनवण्यासाठी सुरूवातीला सेगमेंट तयार करावे लागतात, मात्र हे काम वाटते तितके सोपे नाही, प्रत्येक स्पॅन हा तब्बल 1 हजार टन वजनाचा आहे, 22 एकरमध्ये हे कास्टिंग यार्ड पसरले आहे, ज्यामध्ये दिवसरात्र सेगमेंट्स आणि स्पॅन बनवण्याचे काम सुरू आहे, त्यासाठी 150 मेट्रिक टनाच्या 4 क्रेन, 10 मेट्रिक टनाच्या 10 क्रेन, कामी येत आहेत. या एका यार्ड मध्ये प्रत्येक तासाला 90 क्यूबिक मीटर काँक्रीट बनवले जातेय, हे कास्टिंग यार्ड किती भव्य आहे, तिथे काम कसे चालते याचा एक्सकलुसिव्हली आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांनी... थेट गुजरात मधून...