Suraj Chavan : Anjali Damania यांचा CDR तपासा, लोकेशन ट्रेस करा; राष्ट्रवादीची मागणी
Ajit Pawar on Anjali Damania : पुणे अपघात प्रकरणावरुन गंभीर आरोप करत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची नार्को टेस्ट करा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली होती. दरम्यान, अंजली दमानिया (Anjali Damania) यांचे आव्हान अजित पवार यांनी स्वीकारले आहे. "नार्को टेस्टसाठी तयार आहे, पण टेस्टमध्ये निर्दोष आढळल्यास अंजली दमानिया यांना सन्यास घ्यावा लागेल", असे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar ) म्हणाले. ते मुंबईतील (Mumbai) पत्रकार परिषदेत बोलत होते.
अजित पवार काय म्हणाले ?
अंजली दमानिया यांना प्रत्युत्तर देताना अजित पवार म्हणाले, माझी नार्कोटेस्टची तयारी आहे. पण नार्कोटेस्टमध्ये क्लिअर निघालो तर तिने तुमच्यापुढे (पत्रकार) यायचे नाही, गप्प घरी बसून संन्यास घ्यायचा. तिची तयारी आहे का? असा सवालही अजित पवार यांनी अंजली दमानिया यांना केला.
अजित पवारांचे आव्हान अंजली दमानिया यांनी स्वीकारले
तुम्ही तुमची नार्को टेस्ट करा, जर असं खरं ठरलं तुमचा आणि विशाल अग्रवालचा काही संबंध नाही. तुम्ही यात काही केलेलं नाही तर माझा तुम्हाला शब्द आहे यापुढे मी कोणतेही गोष्टीवर वाच्यता करणार नाही. मी जे प्रश्न लिहून देईल त्यावरच नार्को टेस्ट झाली पाहिजे, असं म्हणत अजित पवारांचे आव्हान अंजली दमानिया यांनी स्वीकारले आहे.