Subhash Desai on Tata Airbus : सत्तांतरानंतरच प्रकल्प गुजरातला कसे गेले? सुभाष देसाईंचा सवाल
Subhash Desai On Tata Air Bus Project: टाटा एअर बसचा प्रकल्प (Tata Air Bus Project) राज्यातून गुजरातमध्ये गेल्यानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. वेदांता-फॉक्सकॉन, बल्क ड्रग्ज पार्क या दोन प्रकल्पानंतर तिसरा प्रकल्प राज्याबाहेर गेल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारवर चहुबाजूने टीका सुरू झाली आहे.
राज्यातील प्रकल्प गुजरातला नेण्यासाठी सत्तांतर झाले असल्याचा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि राज्याचे माजी उद्योग मंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी केला. सत्तांतर झाल्यानंतर राज्यातील तीन मोठे प्रकल्प राज्याबाहेर गेले आणि एकाच राज्यात गेले आहेत. यावर शिंदे-फडणवीस सरकार ब्र देखील का काढत नाही असा सवालही देसाई यांनी केला.
भाजपच्या नेतृत्त्वातील केंद्र सरकारकडून राज्यातील उद्योग पळवापळवी करण्यासाठी मिंदे सरकार आले असल्याची बोचरी टीका देसाई यांनी केली. 'एबीपी माझा'सोबत संवाद साधताना त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले. टाटा-एअर बसचा प्रकल्प हा 22 हजार कोटींच्या प्रकल्पाबाबत सकारात्मक चर्चा सुरू असताना हा प्रकल्प राज्याबाहेर गेल्याने प्रश्न निर्माण होत असल्याचे देसाई यांनी सांगितले. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर तीन मोठे प्रकल्प गेल्याने सरकारच्या भूमिकेवर प्रश्न निर्माण होत आहे. केंद्र सरकारने प्रत्येक राज्याला समान न्याय दिला पाहिजे. मात्र, केंद्राकडून तसे होताना दिसत नसून एका राज्याला झुकत माप दिले जात असल्याचे देसाई यांनी सांगितले.





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
