Special Report Vidhansabha Adhiveshan : विरोधकांची टशन, अधिवेशनाची सुरुवात विरोधकांच्या सभात्यागानं
Special Report Vidhansabha Adhiveshan : विरोधकांची टशन, अधिवेशनाची सुरुवात विरोधकांच्या सभात्यागानं
आज हनुमानाचा दिवस होता. विरोधकांनी शपथ घ्यायला हवी होती असं वक्तव्य भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी केलं. उद्या सुट्टीचा दिवस आहे. कामातून सुट्टी मिळावी, यासाठी उद्या विरोधक शपथ घेणार आहेत का? असा सवाल करत मुनगंटीवार यांनी विरोधकांना टोला लगावला. देव त्यांना सद्बुद्दी देवो असेही ते म्हणाले. महाविकास आघाडीचं नेतृत्व ज्यांनी केलं, त्यांनी शपथ घ्यायला हवी होती असे मुनगंटीवार म्हणाले. ईव्हीएमच्या मुद्यावरुन मुनगंटीवारांची विरोधकांवर टीका ईव्हीएमच्या मुद्यावरुन देखील सुधीर मुनगंटीवार यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. नाचता येईना अन् आंगण वाकडं असं म्हणत मुनगंटीवार यांनी विरोधकांवर टीका केली.ईव्हीएमला जन्म कोणी दिला? 1998 साली तुम्ही कायदा बदलला. ईव्हीएमसंदर्भात तुम्हीच बोलला होता, बॅलेट पेपरवर बुथ कॅप्चरींग होतं, पारदर्शकता राहत नाही. सुप्रिम कोर्टात आव्हान दिलं, मग आता काय झालं? असे सवाल करत मुनगंटीवारांनी विरोधकांचा समाचार घेतला. कर्नाटकात जिंकता, झारखंडमध्ये जिंकले तिथे नाही तुम्ही आक्षेप घेतला असेही मुनगंटीवार म्हणाले. तुम्ही राजीनामे द्या मग दबाव तयार होईल असा टोलाही मुनगंटीवार यांनी लगावला.