Smita Thorat On Rohit Patil : रोहित पाटलांच्या प्रचारात बहीण स्मिता थोरातही सहभागी
Smita Thorat On Rohit Patil : रोहित पाटलांच्या प्रचारात बहीण स्मिता थोरातही सहभागी
तासगाव कवठेमहांकाळ निवडणूकीत आर आर पाटील यांची लेक आणि रोहित पाटीलच्या बहीण स्मिता थोरात सक्रिय झालीय. आर आर आबाना ज्या पद्धतीचा प्रतिसाद तासगाव कवठेमंकाळ मध्ये जनतेकडून मिळत होता तसाच प्रतिसाद रोहितला सुद्धा मिळतोय. जे आज रोहितच्या विरोधात उमेदवार आहेत त्यांना आबांनी राजकीय पटलावरती चितपट केलं होतं. त्याच पद्धतीने रोहित सुद्धा विरोधी उमेदवाराना या विधानसभेच्या राजकीय पटलावरती त्याच मताधिक्याने चितपट करेल याची मला नक्की खात्री आहे असा विश्वास स्मिता थोरात यांनी व्यक्त केलाय. स्मिता थोरात या रोहित पाटील यांच्या प्रचारात सक्रिय झाल्या आहेत. कवठेमंकाळ तालुक्यातील अजितराव घोरपडे गट जरी संजय का पाटील यांच्या सोबत या निवडणुकीत गेला असला तरी त्याचा फारसा परिणाम निकालावर होईल असं वाटत नाही असे स्मिता थोरात यांनी म्हटलेय. सर्वसामान्य जनता ही आजही आबांच्या वर आमच्या कुटुंबावर प्रेम करते. ही निवडणूक भावनिक वगैरे अशा मुद्द्यांना धरून नाहीये तर ही निवडणूक विकासाच्या जोरावरती आहे आणि त्या पद्धतीचा विकास हा रोहित न तीन वर्षात करण्यास प्राधान्य दिलेल आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांच्या जीवावरतीच ही निवडणूक आम्ही लढवत आहोत आणि हे अतिशय भरघोस मताने मतदार रोहीतला मतदान करतील आणि चांगल्या पद्धत मताधिक्यानं रोहित विजयी होईल असा विश्वास असेही स्मिता थोरात यांनी म्हटलंय.
![Top 100 Headlines : टॉप 100 हेडलाईन्स : ABP Majha : Maharashtra News : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/3ca14b5ca903b170e2a5973faf4ca9641739758642708718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 6.30 AM : Maharashtra News : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/e868200333fbbf01319c1a03c3b70a731739756855303718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Headlines : 6.30 AM : एबीपी माझा हेडलाईन्स : 17 Feb 2025 : Maharashtra News](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/e91566874cd488a739234749dec29af01739755612760718_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Bhaskar Jadhav on ShivSena | भास्कर जाधव नाराज, कोकणात मशाल विझणार का? Special Report](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/758e055b823c48efb6ea0d53869e19b41739729040038718_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Mumbai Hotel Tanduri Bhatti | मुंबईच्या हॉटेल्समधील तंदूर पदार्थांची चव बदलणार? Special Report](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/454e1584f365dd9d155976cdeaad3de71739728706644718_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)