एक्स्प्लोर
Smart Bulletin : स्मार्ट बुलेटिन : 19 जानेवारी 2022 : बुधवार : ABP Majha
दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो...
- ओबीसी आरक्षणाशिवाय पार पडलेल्या 106 नगरपंचायती आणि 2 जिल्हा परिषदांचा आज निकाल, प्रत्येक जिल्ह्यातून एबीपी माझाचं लाईव्ह कव्हरेज
- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ओबीसी आरक्षणाचं भवितव्य आज ठरणार, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
- मंत्रिमंडळाच्या आगामी बैठकीत राज्यभरातल्या शाळा सुरु करण्याबाबत चर्चा; टास्क फोर्सचाही हिरवा कंदील, बीडमध्ये शाळा सुरु करण्याबाबत पालकांचं आंदोलन
- मुंबईतील नेव्हल डॉकमध्ये INS रणवीर युद्धनौकेवर स्फोट, 3 जवान शहीद तर 11 जण गंभीर जखमी
- भंडारा पोलिसांनी गावगुंड मोदीला पकडल्याचा नाना पटोलेंचा दावा, मात्र कुणालाही अटक केली नसल्याची भंडारा पोलिसांची माहिती
- नागपुरात जुगारामुळं कुटुंबाची राखरांगोळी, आर्थिक विवंचनेत सापडल्यानंतर पत्नी आणि दोन मुलांची हत्या करुन कुटुंबप्रमुखांची आत्महत्या
- राज्यात मंगळवारी 39 हजार 207 कोरोनाबाधितांची नोंद तर 53 जणांचा मृत्यू
- रेल्वे रुळाशेजारची अनधिकृत घर रिकामी करण्यासाठी 7 दिवसांची मुदत, मात्र मध्य रेल्वेच्या नोटीशीला मंत्री जितेंद्र आव्हाड आणि खासदार श्रीकांत शिंदेंचा विरोध
- जादूटोण्याच्या नावाखाली भोंदूबाबाने पार्टनर व्यावसायिकाला 48 लाखांना लुटलं, व्यावसायिकाचा मृत्यू, विरारमधील धक्कादायक प्रकार
- दक्षिण आफ्रिकेतील वनडे मालिकेसाठी के.ए. राहुलच्या नेतृत्त्वात टीम इंडिया मैदानावर उतरणार, कसोटी मालिकेतल्या पराभवाचा वचपा काढण्याची संधी
महाराष्ट्र
Uddhav Thackeray Matoshri : उद्धव ठाकरे दादरच्या दिशेने रवाना, बाळासाहेबांना अभिवादन करणार
Pune NCP Alliance : पुण्यात मविआशी आघाडी, दादा प्रचंड आशावादी; समीकरणांची गुंतागुंत Special Report
Prithviraj Chavan : कराड किंवा बारामतीमधून पंतप्रधान होणार नाही, तर.. पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले?
Sachin Sawant : दोन दिवसात वंचित संदर्भात निर्णय होईल,सचिन सावंत यांची माहिती
Naresh Mhaske : ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होताच नरेश म्हस्केंनी दिल्या शुभेच्छा म्हणाले..
आणखी पाहा






















