MP Mohan Delkar | खासदार मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणाची एसआयटी चौकशी होणार : गृहमंत्री
मुंबई : दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत आत्महत्या केली होती. या आत्महत्या प्रकरणाची एसआयटी चौकशीची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे. डेलकर यांच्या सुसाईड नोटचा उल्लेख अनिल देशमुख यांनी विधानसभेत केला. डेलकर यांच्या सुसाईड नोटमध्ये दादर नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल्ल खेडा पटेल यांचं नाव आहे. डेलकर यांनी प्रफुल्ल पटेल यांच्यावर गंभीर आरोप केले होते, असं अनिल देशमुख यांनी सांगितलं.
मोहन डेलकर यांनी मुंबईत आत्महत्या केली, कारण त्यांना महाराष्ट्र सरकारकडून न्याय मिळेल याची अपेक्षा होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर माझा विश्वास आहे, असं डेलकर यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे. डेलकर यांच्या पत्नी आणि मुलाने पत्र लिहून प्रफुल्ल खेडा पटेल यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.



















