Sindhudurg : बाळासाहेबांचा फोटो हटवला; राऊतांचा संताप तर भाजपच्या प्रमोद जठारांचं प्रत्युत्तर
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मोठं घमासान झाल्यानंतर सत्तांतर झालं आणि आता बँकेतलं चित्रंही पालटलंय. या निवडणुकीत राणे- ठाकरे वाद रंगला. उद्धव ठाकरेंवर निशाणा साधताना नारायण राणे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंबाबत नेहमीच आदर दाखवलाय. पण सिंधुदुर्ग बँकेत सत्तांतर होताच जिल्हा बँकेच्या अध्यक्षांच्या दालनातील बाळासाहेब ठाकरेंचा फोटो हटवण्यात आलाय. उद्धव ठाकरेंबरोबर बाळासाहेबांचा फोटो दालनात होता. या फोटोबरोबरच सोनिया गांधी आणि शरद पवार यांचेही फोटो बँकेतून हटवण्यात आलेत आणि आता त्याजागी केवळ नारायण राणे यांचा फोटो लावण्यात आलाय. सत्तांतरानंतर बँकेतील या घडामोडींची चर्चा आता चांगलीच रंगलीय.....
सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्षांच्या दालनातून बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो हटवण्यात आल्यानंतर शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया समोर आलीय. बाळासाहेब ठाकरेंच्या कृपेनं नारायण राणे आणि त्यांचे कुटुंबीय मोठे झाले. त्या बाळासाहेबांची प्रतिमा हटवत असताना त्यांच्यातील माणुसकी हरवली आहे, अशी टीका शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केलीय. तर भाजपच्या प्रमोद जठार यांनी राऊत यांना उत्तर दिलंय.