![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Shivraj Bangar Beed : कथित ऑडिओ क्लिपमधला आवाज माझा नाही, शिवराज बांगर यांचं स्पष्टीकरण
बीडमध्ये शिंदे गटाच्या नेत्याची शरद पवार गटाच्या उमेदवाराला मदत झालीय का? असा प्रश्न निर्माण होतोय. त्यामागील कारणही तसंच आहे. शिंदे गटाच्या एका नेत्याची ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या ऑडिओ क्लिपची ‘टीव्ही 9 मराठी’ पुष्टी करत नाही. पण या ऑडिओ क्लिपमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शिवराज बांगर आणि शिंदे गटाचे कुंडलिक खांडे यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. ही क्लिप लोकसभा निवडणुकीच्या काळातील असल्याचा दावा केला जातोय. या क्लिपमध्ये शिंदे गटाचे कुंडलिक खांडे हे मी पहिल्यांदाच पंकजा मुंडेंना धोका दिला, असं म्हणत असल्याचं ऐकू येत आहे. आपण 376 बुथवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनावणे यांना मदत केली, असं कुंडलिक खांडे म्हणाले आहेत. कुंडलिक खांडे हे शिंदे गटाचे बीडचे जिल्हाप्रमुख आहेत.
![ABP Majha Headlines 3PM एबीपी माझा हेडलाईन्स 3 PM 08July 2024 Marathi News](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/08/ed1d9666bb5737b62162c0550c7371d41720431598115976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![OBC Reservation Meeting : ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वपक्षीय नेत्यांची बैठक रद्द](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/08/8221c5aa6317e4cc1f555ff49e02d2e31720431461340718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Headlines 2AM एबीपी माझा हेडलाईन्स 02 AM 08 July 2024 Marathi News](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/08/d38e19b079d02b56d4bd2979005653891720430971705976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Sant Tukaram Maharaj Palkdhi Mendi Ringan : काटेवाडीच्या अंगणात तुकोबांच्या पालखीला मेंढ्यांचं रिंगण](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/08/201cb47918c1b8939428357cbb222c521720430374381718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Devendra Fadnavis On Mumbai Rain : देवेंद्र फडणवीसांकडून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/08/5ec39cd84c717f70ba4f97582a3cd5191720430559210976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)