Nagpur MLA Photo Session : टाळी देऊन हास्यविनोद, गळ्यात पडून हसले,भिडणारे शिवसैनिक खेळीमेळीत दिसले
CM Eknath Shinde Meet Sunil Prabhu : Nagpur Winter Session : टाळी देऊन हास्यविनोद, गळ्यात पडून हसले,भिडणारे शिवसैनिक खेळीमेळीत दिसले
नागपूर: राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचा (Maharashtra Winter session) आजचा सहावा दिवस आहे. गेल्या 6 दिवसांपासून विधीमंडळाच्या विधानसभा (Maharashtra Vidhan Sabha) आणि विधानपरिषद (Maharashtra Vidhan Parishad) या दोन्ही सभागृहात सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांशी भिडताना दिसले. मात्र आज सर्वपक्षीय आमदाराच्या एकत्र फोटोसेशनवेळी महाराष्ट्राच्या राजकीय प्रगल्भतेचं चित्र पाहायला मिळाले. सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांचे हेवेदावे विसरुन, सर्व आमदार खेळीमेळीत पाहायला मिळाले. विधीमंडळ अधिवेशन कामकाजादरम्यान, सर्वपक्षीय फोटोसेशनचे परंपरा आहे. दरवर्षी हे फोटोसेशन होते. आजही विधानसभेच्या सर्वपक्षीय आमदारांनी एकत्र फोटोसेशन केले. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर मध्यभागी तर त्यांच्या उजव्या बाजूला उपमुख्यमंत्री अजित पवार, डाव्या बाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाहायला मिळाले. दरम्यान या फोटोसेशननंतर एकमेकांना भिडणारे ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या शिवसेनेमध्येही वेगळं चित्र पाहायला मिळालं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू या दोघांमध्ये हास्यविनोद पाहायला मिळाले. दोघेही एकमेकांना टाळ्या देऊन हसताना दिसले. त्यावेळी बाजूला देवेंद्र फडणवीस, आमदार संतोष बांगर उपस्थित होते.
![Manikrao Kokate On Crop insurance : भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही,आम्ही एक रुपयात पिक विमा दिला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/14/fc2d4052805f84aa2450fd64184fddf41739522900607976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Sanjay Raut Mumbai PC : माझ्यात बोलायची हिंमत! तेव्हा दुतोंडी गांडूळ कुठे होते?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/14/c523520e50f75c3b286c43ea819788791739517118726976_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Pm Modi Meet Donald Trump :गाळाभेट, हस्तांदोलन; डोनाल्ड ट्रम्प-पंतप्रधान मोदींच्या भेटीची EXCLUSIVE दृश्य](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/14/9f072c8968a41ef71104b4d9a0c414e51739510885705976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Harshwardhan Sapkal : काँग्रेसच्या नवीन प्रदेशाध्यक्षांचा अजेंडा काय? हर्षवर्धन सपकाळ EXCLUSIVE](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/14/ea34358efafa0c593e026bae07cd4ad91739506651863976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Marathi News Headlines 9 AM TOP Headlines 9AM 14 February 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/14/a80dff2d232f74f3fd0f9d494a2617fc1739505318125976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)