Shikhar Bank Scam Case: शिखर बँक घोटाळा प्रकरणी अजित पवारांच्या क्लिनचीटवर अण्णा हजारेंचा आक्षेप
Shikhar Bank Scam Case: शिखर बँक घोटाळा प्रकरणातल्या (Shikhar Bank Scam Case) अतिरिक्त क्लोजर रिपोर्टला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) आव्हान देणार आहेत. अजित पवार (Ajit Pawar) यांना दिलेल्या क्लीन चिटला अण्णा हजारे विरोध करणार असून त्यासंदर्भात त्यांनी कोर्टात धाव घेतली आहे.
अण्णा हजारे आणि माणिकराव जाधव यांच्या वकिलांनी पोलिसांच्या अतिरिक्त क्लोजर रिपोर्टवर आक्षेप घेतला आहे. न्यायालयानं हा आक्षेप मान्य करत निषेध याचिका दाखल करण्यास अण्णा हजारे आणि माणिकराव जाधव यांच्या वकिलांना वेळ दिला आहे. तर 29 जूनला पुढची सुनावणी होणार आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं अजित पवार आणि इतरांना क्लीन चिट दिली आहे.
काय आहे शिखर बँक घोटाळा प्रकरण ? HEADER
नाबार्डकडून २००७-११ दरम्यानचे ऑडिट
ऑडिटमध्ये बँक व्यवहारांत अनेक अनियमितता
२०१३ ला बँकेच्या कामकाजाची चौकशी
चौकशीत बँकेकडून नियमबाह्यपणे २५ हजार कोटींचे कर्जवाटप
कोट्यवधींची थकहमी दिल्यानं बँकेचं नुकसान
शरद पवार,अजित पवारांसह ७० जणांविरुद्ध गुन्हे दाखल
७० जणांत विजयसिंह मोहिते,आनंदराव अडसूळ,शिवाजी नलावडे
पोलीस तपासांत मात्र घोटाळ्याचे पुरावे नसल्याचा निष्कर्ष
जानेवारी २०२४ मध्ये अजित पवार,सुनेत्रा पवारांना क्लीन चीट