Sharad Pawar Vs Ajit Pawar : पक्ष, चिन्हाच्या निवडीसाठी वेळ मिळावा म्हणून पवार गटाकडे दोन पर्याय
Sharad Pawar Vs Ajit Pawar : पक्ष, चिन्हाच्या निवडीसाठी वेळ मिळावा म्हणून पवार गटाकडे दोन पर्याय
राज्यसभेला उमेदवार दिला नाही तर तातडीने चिन्ह निवडण्याचं बंधन नाही
अजित पवारांना राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने काल घेतला.. आणि आज शरद पवार गटाला पक्षाचं नवीन नाव आणि चिन्हाचे पर्याय देण्याची मुदत दिली.. मात्र शरद पवार गटाला पक्ष आणि चिन्हाच्या निवडीसाठी वेळ मिळावा म्हणून पवार गटासमोर सध्या दोन पर्याय दिसून येतात.. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी पवार गटाने उमेदवार दिला नाही तर त्यांच्यावर तातडीने पक्षासाठी नवं नाव आणि चिन्ह घेण्याचं बंधन नाही तसंच दुसरी शक्यता म्हणजे पवार गट उद्यापर्यंत वेळ वाढवून मागू शकतो..






















