एक्स्प्लोर
School Principal Drinking | बीडच्या गेवराईत मुख्याध्यापक शाळेत दारू पिताना रंगेहात पकडलं
बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील श्रीपत अंतरवाला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शाळेचे मुख्याध्यापक सुधाकर कुलकर्णी हे सोमवारी सकाळी शाळेतील वर्गातच दारू पिताना रंगेहात पकडले गेले. नेहमीप्रमाणे शाळेत आल्यानंतर त्यांनी वर्गातच दारूचे सेवन केले. ही बाब गावातील पालकांच्या निदर्शनास आली. त्यानंतर अनेक पालकांनी शाळेत गर्दी केली. पालकांनी मुख्याध्यापक दारू पितानाचे फोटो आणि व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये कैद केले. या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. ग्रामस्थांनी या संपूर्ण प्रकाराची माहिती तलवाडा पोलिसांना दिली आहे. पोलिसांनी या घटनेची दखल घेतली असून पुढील कारवाई सुरू केली आहे. शाळेच्या पवित्र वातावरणात मुख्याध्यापकाने केलेल्या या कृत्यामुळे पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्र
Sanjay Raut Full PC : शिवाजी पार्कात आमची सभा होऊ नये यासाठी विरोधकांचे प्रयत्त सुरु
Uddhav Thackeray-Raj Thackeray PC: वचनामा जाहीर,महायुतीवर निशाणा, ठाकरे बंधूंची रोखठोक पत्रकार परिषद
Aaditya Thackeray on Coffee With Kaushik : Raj-Uddhav ठाकरे बंधू विरोधकांना सपाट करणार: आदित्य ठाकरे
Manjusha Nagpure PMC Election : पुण्यात भाजपचा उमेदवार बिनविरोध;मंजुषा नागपुरेंची पहिली प्रतिक्रिया
Devendra Fadnavis : मुंबईचा महापौर महायुतीचा, हिंदू, मराठीच; फडणवीसांचा एल्गार, ठाकरे बंधूंवर प्रहार
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
व्यापार-उद्योग
निवडणूक





















