Sanjay Raut Speech Full : उद्या आम्ही ठरवू शाह देशात राहतील की तुरुंगात, संजय राऊतांचं स्फोटक भाषण
Sanjay Raut Speech Full : उद्या आम्ही ठरवू शाह देशात राहतील की तुरुंगात, संजय राऊतांचं स्फोटक भाषण
संजय राउतांची भरत गोगावलेंवर जोरदार टीका टॉवेल घालून बसलेल्या मंत्र्यांचा ह़ॉरर सिनेमा बघितला शिवसेनाला आज ५९ वर्ष होतं आहेत. देशाच्या राजकारणातील हा चमत्कार आहे. आज हॉरर शो झाला. कुणीतरी एक मंत्री अघोरी बाबा समोर उघडा बंब बसलाय. टॉवेलवर. त्याच्या खुर्ची खाली कदाचित रेड्याचे शिंग असेल. या हॉरर सिनेमाचे निर्माते दिग्दर्शक यांचे देखील कुठेतरी कार्यक्रम सुरू आहे वरळी डोम मधे देशला विचार देण्याच काम शिवसेनेनं केलं आहे. मराठवाड्यात असंख्य तालुक्यात अंबादास दानवे यांनी कार्यक्रम केला. क्या हुआ तेरा वादा… या सिनेमाचे नाव आहे हम किसीसे कम नही. प्रत्येक शिवसैनिकाने लक्षत ठेवायला हव मुंबईत इकडे तिकडे होर्डिंग लागले आहे. ज्यांचा जन्म २ वर्षापूर्वी झाला ते सुद्धा आज वर्धापन दिन सोहळा करायला हवा. तुमचा जन्म झाला गुजरात मधे झाला तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो कसा काय लावता? तुम्ही अमित शाह किंवा नरेंद्र मोदी यांचा फोटो लावा. देवेंद्र फडणवीस याना कार्यक्रम स्पॉनसर करायला लावतो. बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं होतं की देशात दोन सेना राहतील एक शिवसेना आणि दुसरी भारतीय सेना बाकी सगळ्या गुंडांच्या टोळ्या हे स्वतःला वाघ समजतात परंतु वाघ कधी गवत खात नाहीत हे अमित शाह मोदींचे गवत खातात. देशातील सर्वात जुना पक्ष कुठला असेल तो शिवसेना आहे. सेना संघर्ष करत होती त्यावेळी आजचे सगळे पक्ष पाळण्यात होते. इंदिरा काँग्रेस जन्म १९७६ साली झाला शरद पवारांचा पक्ष १९९९ साली जन्माला आला भाजप पक्ष १९८० साली भाजप जन्माला आला एकमेव शिवसेना हा जुना पक्ष आहे आपण माकडांची माणसं केली. त्या माणसांना सरदार सुद्धा बनवलं, त्या सरदारांनी पाठीत घाव घातला तरी ही शिवसेना वाकली नाही. इथ सरेंडर होणारे बरेच आहेत. इथ ट्रमचा फोन आला आणि हे लगेच सरेंडर झाले पहलगामला ४ लोक येतात धर्म विचारतात आणि गोळ्या झाडतात. आता या घटनेला २ महिने झाले परंतु अद्याप त्यांना पकडू शकले नाहीत. कुठे गेली ५६ इंच छाती ते जमिनीत गडब झाले आकाशात गेले पाताळात गेले ? त्यांचा देशाच्या गृहमंत्र्यांना अद्याप शोध घेता आला नाही. ज्यावेळी हल्ला झाला त्यावेळी उद्धव ठाकरेंनी आम्हाला सरकार सोबत ठामपणे उभा राहण्याबाबत सांगण्यात आलं. आता ते हल्ल्याच्या जीवावर मत मागत आहेत. आमच सैन्य पुढे जात होतं आणि त्यावेळी ट्रम्पचा फोन येतो आणि देश आपला माघारी घेतो. ती माघार का घेतली हे अद्याप सांगण्यात आलं नाही. तेच ट्रम्प पाकिस्तान लष्कर प्रमुखांना बोलवतात आणि आय लव्ह पाकिस्तान म्हणतात… आता डी सरकार आहे म्हणजेच डरपोक सरकार आहे. शिवसैनिक खचणारा नाही. आम्ही लढणारे लोक आहोत. उद्धव ठाकरे देखील सगळी आव्हान अंगावर घेऊन लढत आहे. राज्यात शिवसेना नेते जित जातात तिथ शेतकरी कष्टकरी एकत्र येत आहेत. ते आजही संघर्ष करायला तयार आहे. संघर्ष हाच आमच्या विजयाचा मंत्र आहे गोपाल दास नीरज कवी आहेत… निवडणूक आयोग आणि अमित शहा ठरवू शकत नाही की शिवसेना कोणाची आहे. उद्या आम्ही ठरवू की अमित शहा देशात राहतील की तुरुंगात राहतील.
महत्त्वाच्या बातम्या


















