Sanjay Raut Full PC : माहीममध्ये शिवसेनेची स्थापना; तिथे लढणार नाही असं होणार नाही - संजय राऊत
Sanjay Raut Full PC : माहीममध्ये शिवसेनेची स्थापना; तिथे लढणार नाही असं होणार नाही - संजय राऊत
जागावाटपातच नाही तर विजयातही शिवसेना सेंच्युरी मारणार असा विश्वास शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) व्यक्त केला. तर संध्याकाळपर्यंत ठाकरे गटाची पहिली यादी येणार आहे. जागावाटप 99 टक्के पूर्ण झाले असून घोषणेची केवळ औपचारिकता असे देखील संजय राऊत म्हणाले. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते. जागावाटपाविषयी बोलताना संजय राऊत म्हणाले, महाविकास आघाडीमध्ये मोठा संसार आहे. 99 टक्के जागावाटपाचा काम पूर्ण झाले आहे. आम्हाला सरकार बनवायचं आहे. उद्याचे आम्ही सत्ताधारी आहोत, त्यामुळे तोलून मापून आम्ही जागा वाटप करत आहोत . आज संध्याकाळपर्यत पत्रकार परिषद घेणार आहे. तीन पक्षाचे प्रमुख या परिषदला उपस्थिती राहतील. शिवसेनेला जागा वाटपत सेंच्युरी मारावी अशी अपेक्षा आहे. सोबतच तेवढेच निवडून येऊ अशी आशा आहे. शिवसेना कोणत्याही प्रकारची सौदेबाजी करत नाही : संजय राऊत वरळीच्या जनतेने आदित्य ठाकरे यांच काम पाहिल आहे . शिवसेना कोणत्याही प्रकारची सौदेबाजी करत नाही. नांदगाव मतदार संघ हा ठाकरे गटाकडेच राहील. आम्ही कोणत्याही प्रकारची सौदेबाजी करत नाही . इथल्या हुकुमशाहीला मी विरोध केला म्हणून मला अटक झाली , असेही संजय राऊत म्हणाले.