एक्स्प्लोर
Sangli Shop Fire : विटा शहरात दुकानाला भीषण आग, चौघांचा मृत्यू
सांगलीतील (Sangli) विटा (Vita) शहरात एका दुकानाला लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला. आमच्या प्रतिनिधी कुलदीप माने यांच्या माहितीनुसार, 'दुकानामधील फ्रीजच्या ठिकाणी सिलिंडरचा स्फोट झाल्याची माहिती मिळाल्यानं या स्फोटामुळं भीषण आग' लागली. विट्याच्या जुना वासुंबे रोडवरील सावरकर नगर (Savarkar Nagar) येथील एका भांड्याच्या दुकानाला ही आग लागली होती, जेथे इलेक्ट्रॉनिक वस्तूंची विक्रीही केली जात होती. भांड्यांच्या दुकानाच्या वरच्या मजल्यावर राहणाऱ्या कुटुंबातील दोन पुरुष, एक महिला आणि एका लहान मुलीचा या दुर्घटनेत होरपळून मृत्यू झाला. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली आहे. मात्र, या दुर्दैवी घटनेत संपूर्ण कुटुंब मृत्युमुखी पडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. आगीच्या नेमक्या कारणांचा आणि नुकसानीचा पंचनामा करण्याचे काम सुरू आहे.
महाराष्ट्र
Pune NCP Alliance : पुण्यात मविआशी आघाडी, दादा प्रचंड आशावादी; समीकरणांची गुंतागुंत Special Report
Prithviraj Chavan : कराड किंवा बारामतीमधून पंतप्रधान होणार नाही, तर.. पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले?
Sachin Sawant : दोन दिवसात वंचित संदर्भात निर्णय होईल,सचिन सावंत यांची माहिती
Naresh Mhaske : ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होताच नरेश म्हस्केंनी दिल्या शुभेच्छा म्हणाले..
Raj Uddhav Thackeray Brothers Alliance : उद्या दुपारी 12 वाजता ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार
आणखी पाहा
Advertisement
Advertisement






















