Sameer Wankhede : मी हिंदू होतो आणि हिंदू आहे...काय काय म्हणाले समीर वानखेडे झलेल्या आरोपांवर ?
समीर वानखेडेंवर आरोपांचा बॉम्ब फोडण्याची मालिका राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिकांनी सुरुच ठेवली आहे. क्रूझ पार्टीवर आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफिया प्रेयसीसह सहभागी झाला होता. एवढंच नव्हे तर तो घातक शस्त्र घेऊन आला होता..आणि हा ड्रग्ज माफिया समीर वानखेडेंचा मित्र आहे असा गंभीर आरोप नवाब मलिकांनी केला आहे. बनावट जातीचं प्रमाणपत्र सादर करुन समीर वानखेडेंनी नोकरी मिळवली या आरोपाचा पुनरुच्चार करताना, नवाब मलिकांनी समीर वानखेडेंना चॅलेंज दिलंय. जर जातीचं प्रमाणपत्र बनावट नाही हे वानखेडेंनी सिद्ध करावं नाही तर माफी मागावी...आणि आरोप खोटे सिद्ध झाल्यास राजकारण सोडेन अशा शब्दात मलिकांनी आव्हान दिलं आहे. समीर वानखेडेंच्या पहिल्या पत्नीला धमकावण्यात येत असल्याचा आरोपही मलिकांनी केला आहे. यावर ABP माझाशी बोलताना समीर वानखेडे यांनी त्यांची बाजू मांडली आहे.






















