Saleel Kulkarni on Election : तक्रार नंतर करा आधी मतदान करा! सलील कुलकर्णींचं तरुणांना आवाहन
Saleel Kulkarni on Election : तक्रार नंतर करा आधी मतदान करा! सलील कुलकर्णींचं तरुणांना आवाहन
सोशल मीडियावर तुमच्या ज्या काही तक्रारी आहेत त्या नंतर करा पण आधी बाहेर या आणि मतदान करा असे आवाहन प्रसिद्ध गायक सलील कुलकर्णी यांनी केलं आहे. ते त्यांच्या मुलगा शुभंकर कुलकर्णी याच्यासोबत कोथरूड विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आले होते. मूलभूत गोष्टी याबद्दल सांगायची गरज का पडते, त्यामुळे तरुणांनी बाहेर येऊन मतदान करावं असं आवाहन त्यांनी केलं. सलील कुलकर्णी यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी यांनी..
हे ही वाचा,,
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आंबेगावमध्ये सभा घेतली. या सभेत शरद पवार यांनी दिलीप वळसे पाटील यांना जे शक्य होतं ते दिलं, असं म्हटलं. याशिवाय दिलीप वळसे पाटील यांनी गद्दारी केली, गद्दारांना सुट्टी द्यायची नसते, असं म्हणत त्यांचा पराभव 100 टक्के करा, असं ते म्हणाले. शरद पवार यांच्या सभेनंतर आयोजित करण्यात आलेली पत्रकार परिषद दिलीप वळसे पाटील यांनी रद्द करण्याचा निर्णय घेतला.
आजवर मानसपुत्र समजले जाणारे दिलीप वळसेंवर आज शरद पवारांनी थेट गद्दारी केल्याचा शिक्का मारला. भर सभेत शरद पवारांनी असं बोलताच दिलीप वळसेंनी सभेनंतरची पत्रकार परिषद अचानकपणे रद्द केली. शरद पवार आपल्याबद्दल कधी असं बोलतील याचा विचार वळसेंनी कधी केला नसेल पण आज थेट गद्दारी करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असते म्हणत गद्दारी करणाऱ्यांना आता सुट्टी नाही. वळसे पाटील यांचा 100 टक्के पराभव करा अन् देवदत्त निकमांना विजयी करा, असं आवाहन शरद पवार यांनी केलं.