(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ramesh Chennithala Meet Uddhav Thackeray : आज दुपारी मातोश्रीवर रमेश चेन्नीथला आणि उद्धव ठाकरेंची भेट
Ramesh Chennithala Meet Uddhav Thackeray : आज दुपारी मातोश्रीवर रमेश चेन्नीथला आणि उद्धव ठाकरेंची भेट
हे ही वाचा...
राज्यात विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवारांच्या संख्येने यंदा उच्चांक गाठला आहे. राज्यात आजवर झालेल्या तेरा विधानसभा निवडणुकांच्या उमेदवारांच्या सरासरीच्या तुलनेत तिप्पट उमेदवार यंदा निवडणुकीच्या मैदानात आहेत. विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर राज्यात 288 मतदार संघात 7 हजार 995 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
दरम्यान, आजवर झालेल्या 13 विधानसभा निवडणुकांमध्ये सरासरीने 2 हजार 581 उमेदवार उभे राहायचे. मात्र आजवरच्या तेरा निवडणुकांमध्ये सर्वाधिक 4 हजार 727 उमेदवार 1995 मध्ये उभे होते. तर 2014 मध्ये 4 हजार 407 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात होते. यंदा मात्र आजवरच्या 13 विधानसभा निवडणुकीच्या सरासरीच्या तुलनेत तिप्पट पेक्षा जास्त म्हणजेच 7 हजार 995 उमेदवार उभे राहिले आहे. त्यामुळे यावेळेची निवडणूक अधिक चुरशीची होणार असून नेमकं कोणाचे वर्चस्व राज्यात असणार आहे हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.