Ramdas Kadam On Gajanan Kirtikar : बायकोशी गद्दारी, पुण्यात शेण खायला का जाता? किर्तीकरांचं वस्रहरण
मुंबई: एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे (Shiv Sena) दोन ज्येष्ठ आणि बडे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) आणि खासदार गजानन कीर्तीकर (Gajanan Kirtikar) यांच्यातील वादाने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. रामदास कदमांनी पुन्हा एकदा गजनान किर्तीकरांचे 'वस्त्रहरण' केलं. गजानान कीर्तीकर यांनी आपल्या बायकोशी गद्दारी केली आहे, पुण्याला काय करायला जाता? पुण्यात शेण खायला का जाता?, असं म्हणत रामदास कदम यांनी गजानन कीर्तीकर यांची पर्सनल लाईफ काढली. एबीपी माझाशी बोलताना रामदास कदम यांनी गजानन कीर्तीकरांवर स्फोटक आरोप केले. तुमचं वस्रहरण केलं तर तुम्हाला महिला मतं देणार नाहीत. महिला तुम्हाला चपलेने मारतील. पुण्यात काय आहे हे जर सांगितलं तर गजनान कीर्तीकरांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना 6 वाजता भेटायला जाणार आहे, रामदास कदम म्हणाले.