एक्स्प्लोर
Maharashtra Politics : MVA मध्ये नवा भिडू?Raj Thackeray यांचं मविआसोबत सूत जुळवण्याचा प्रयत्न?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि महाविकास आघाडी (MVA) यांच्यातील जवळीकीच्या चर्चांना उधाण आले आहे, कारण ते MVA नेत्यांसोबत मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीला जाणाऱ्या शिष्टमंडळात सामील होण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी 'लोकशाही वाचवण्याकरता, मोदींना हटवण्याकरता India Alliance आणि महाविकास आघाडी गठित झालेली आहे. या सूत्रांच्या संदर्भामध्ये नवीन येणाऱ्या भिडूचं काय म्हणणं आहे याची स्पष्टता येणं ही प्राथमिक गरज आहे,' असे म्हणत यावर सावध भूमिका घेतली आहे. खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी या सर्वपक्षीय शिष्टमंडळाच्या भेटीची माहिती दिली, तर राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) राज ठाकरेंच्या संभाव्य सहभागाचे स्वागत केले आहे. दुसरीकडे, महायुतीने (Mahayuti) हा एक 'केविलवाणा प्रयत्न' आणि 'स्टंटबाजी' असल्याचे म्हटले आहे. या घडामोडींमुळे राज ठाकरे मविआमध्ये सामील होणार का, यावर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
पुणे
जळगाव
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement

















