Raj Thackeray Majha Vision : अमित ठाकरे का उतरले मैदानात? वडिलांनीच सांगितली INSIDE STORY
Raj Thackeray Majha Vision : अमित ठाकरे का उतरले मैदानात? वडिलांनीच सांगितली INSIDE STORY
महाराष्ट्रातील लक्षवेधी लढतींपैकी काही खास असलेल्या काही लढतींमध्ये मुंबईतील ठाकरे बंधुंच्या लढतीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. कारण, गत निवडणुकीत मैदानात उतरत आदित्य ठाकरेंनी वरळीचा गड जिंकली होती. त्यानंतर, यंदा प्रथमच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र आणि दुसरे ठाकरे विधानसभा निवडणुकीच्या मैदानात आहेत. अमित ठाकरेंनी माहीम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे, राज्यासह राजकीय वर्तुळाचे लक्ष अमित ठाकरेंच्या लढतीकडे लागले आहे. त्यातच, येथील मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून महायुतीचे उमेदवार म्हणून सदा सरवणकर मैदानात आहेत. तर, महाविकास आघाडीकडून ठाकरेच्या महेश सावंत यांचे आव्हान अमित ठाकरेंना असणार आहे. त्यामुळे, येथील लढत चुरशीची मानली जाते. त्यातच, राज ठाकरेंनी महाराष्ट्र व्हीजन कार्यक्रमात बोलताना अमित ठाकरे माहीत विधानसभा मतदारसंघातूनच निवडणूक का लढवत आहेत, यामागील राजकारण सांगितलं.
राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनंही यंदा 'एकला चलो रे'चा नारा देत विधानसभा मतदारसंघात उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामध्ये, राजपुत्र म्हणजेच अमित ठाकरे यांना माहीम विधानसभा मतदारसंघातून मैदानात उतरविण्यात आलं आहे. आता, अमित ठाकरेंना माहीत विधानसभा मतदारसंघातूनच विधानसभेच्या रिंगणात का उतरवले, याचं उत्तर स्वत: राज ठाकरे यांनीच दिलं आहे. माहीमच का निवडले?, या प्रश्नावर राज ठाकरे म्हणाले की, नेत्यांची बैठक झाली, अमित म्हणाला, पक्षाने सांगितलं तर प्रत्येकाने लढावं, मी सुद्धा लढेन. मी अमितला म्हणालो, तू सिरियस आहेस, तो म्हणाला पक्षाने सांगितलं तर प्रत्येकाने लढावे , मी सुद्धा लढेन. आधी भांडुप बद्दल चर्चा.. मी म्हणालो भांडुप?, निवडणूक लढणे हे माझे टेम्परामेंट नाही. मी बाळासाहेबांच्या विचाराने वाढलो, अमितला कसं समजावयचे याचा मी विचार करत होतो. अमितने ठरवले आहे, आज उभा केलं नाही, तर उद्या उभा करावाच लागेल, असे म्हणत राज ठाकरे यांनी अमित ठाकरेंच्या निवडणूक लढविण्याबाबत माहिती दिली.