एक्स्प्लोर
Pune Land Scam: 'चोर-मावसभाऊंचं राज्य, तू मला वाचव मी तुला वाचवतो', Vijay Wadettiwar यांचा घणाघात
पुण्यातील कथित जमीन घोटाळ्यावरून (Pune Land Scam) विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि त्यांचे पुत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. वडेट्टीवार म्हणाले, 'महायुतीचं सरकार म्हणजे आळी मिळी, चुप्पी छोडी, तूही खा, मीही खातो, तू मला वाचव, मी तुला वाचवतो, असा चोर-मावसभाऊ कारभार सुरू आहे'. पुण्यातील मौजे मुंढवा येथील सुमारे १८०० कोटी रुपयांची महार वतनाची जमीन पार्थ पवार यांच्या भागीदारी असलेल्या 'Amadea Enterprises LLP' कंपनीला अवघ्या ३०० कोटींना विकल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या व्यवहारात २१ कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी माफ करण्यात आल्याचा दावाही वडेट्टीवार यांनी केला. या प्रकरणात FIR दाखल झालेल्या शीतल तेजवानी (Sheetal Tejwani) यांचा पती सागर सूर्यवंशी (Sagar Suryavanshi) हा सेवा विकास बँक घोटाळ्यातील आरोपी असल्याचा योगायोग नाही, असेही ते म्हणाले. वडेट्टीवार यांनी या संपूर्ण प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे.
महाराष्ट्र
Supriya Sule Meet Amit Shah : सुप्रिया सुळे आज दिल्लीत अमित शहांची भेट घेणार, कारण काय?
Shiv Sena UBT MNS Alliance Raj Uddhav Thackeray : दोन दिवसांत ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा?
Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
आणखी पाहा
Advertisement
Advertisement























