Pune : पुण्यात मुसळधार, खडकवासलातून विसर्ग कमी केल्याने पुणेकरांना काहीसा दिलासा
पुण्यात खडकवासला धरणातून सुरु असलेला विसर्ग कमी करण्यात आलाय... मुसळधार पावसामुळे काल खडकवासला धरणातून २६ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय. त्यामुळे डेक्कन इथला बाबा भिडे पूल पाण्याखाली गेला. पाणी अचानक वाढू लागल्याने रस्त्यावरील वाहनं पाण्याखाली गेली होती.. ही वाहनं काढण्यासाठी पुणेकरांनी धाव घेतली.... यावेळी अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी अग्निशमन दल आणि पुणे पालिकेच्या वतीने बचावकार्य राबवण्यात आलं... मात्र आता पावसाचा जोर काहीसा ओसरलाय आणि त्यामुळे खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात १३ हजार ८०० क्यूसेकनं विसर्ग सुरु आहे. त्यामुळे कालच्या तुलनेत रस्त्यावर साचलेल्या पाण्याची पातळी काहीशी कमी होऊ लागलीय. मात्र बाबा भिडे पूल अजूनही पाण्याखालीच आहे.. रस्त्यावर अजूनही पाणी साचलेलं आहे.. नदीपात्रातील रस्ते अजूनही बंदच आहेत.. त्यामुळे सकाळी पुणेकरांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे... धरण क्षेत्रात अजूनही पाऊस सुरु असून हा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय.. त्यामुळे पुढील काही तासात पुण्यातील वाहतुकीवर मोठा परिणाम होऊ शकतो...