एक्स्प्लोर
Jalgaon News : 'तीन दिवस झाले हेलपाटे मारतेय', जळगाव मनपाच्या कारभारावर नागरिक संतप्त
जळगाव (Jalgaon) महापालिकेत जन्म आणि मृत्यूचे दाखले मिळवण्यासाठी नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे, ज्यामुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. 'जन्म दाखल्यासाठी मी तीन दिवस झाले येतेय, आज टोकन संपले तर उद्या अर्जात चूक सांगून परत पाठवलं जातंय', अशी व्यथा एका महिलेने खासदार स्मिता वाघ (MP Smita Wagh) आणि आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे (Commissioner Dnyaneshwar Dhere) यांच्यासमोर मांडली. महापालिकेबाहेर पहाटेपासून लांबच लांब रांगा लागत असून, या भुंगळ कारभाराविरोधात नागरिकांनी 'रन फॉर युनिटी' कार्यक्रमावेळी आपला रोष व्यक्त केला. यानंतर आयुक्त ढेरे यांनी सोमवारपासून मनुष्यबळ आणि कॉम्प्युटरची संख्या दुप्पट करून त्याच दिवशी दाखला देण्याचे आश्वासन दिले आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रीडा
जालना
क्रीडा
Advertisement
Advertisement
















