Pranit More Bigg Boss 19: कन्फर्म गूड न्यूज? प्रणीत मोरेची बिग बॉसच्या घरात वापसी; चाहत्यांमध्ये आनंदाची लाट, म्हणाले, 'सावध राहा, शोचा विनर येतोय...'
Pranit More Bigg Boss 19: 'बीबी तक' आणि 'द खबरी' यांनी सोशल मीडियावर रिअॅलिटी शोबद्दल माहिती शेअर केलीय. त्यांनी सांगितलंय की, प्रणीत मोरे बिग बॉसच्या घरात वापसी करणार आहे.

Pranit More Bigg Boss 19: 'बिग बॉस 19' (Bigg Boss 19) या रिअॅलिटी शोबद्दल (Reality Show) नवी अपडेट आलीय. काही दिवसांपूर्वी फक्त महाराष्ट्राचाच (Maharashtrian Bhau) नाहीतर, संपूर्ण देशाच्या मनात आपल्या हक्काचं स्थान निर्माण केलेला 'महाराष्ट्रीयन भाऊ' डेंग्यू झाल्यामुळे शोमधून बाहेर गेलेला. तेव्हापासूनच चाहते नाराज असल्याचं पाहायला मिळत होतं. अशातच प्रणीत मोरे (Pranit More) बाहेर पडल्यामुळे शो पाहायची इच्छा नाही, प्रणीतला परत आणा, अशा अनेक कमेंट्स, पोस्ट पाहायला मिळाल्या. त्यानंतर प्रणीत मोरेच्या टीमनं हेल्थ अपडेट शेअर केल्यामुळे चाहत्यांना प्रणीत शोमध्ये परतण्याचे चान्सेस आहेत, अशी हिंट मिळाली. तेव्हापासूनच प्रणीत मोरे शोमध्ये परतणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. अशातच नुकतीच बिग बॉसमधल्या सर्व खबरी पोहोचवणाऱ्या सोशल मीडियावरच्या एका ट्वीटर हँडलवर प्रणीत मोरे शोमध्ये परतणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं. क्षणार्धात ही पोस्ट जोरदार व्हायरल झाली आणि त्या प्रणीत मोरे लवकरच बिग बॉसच्या घरात परत येऊ शकतो, असं बोललं जात आहे.
'बीबी तक' आणि 'द खबरी' यांनी सोशल मीडियावर रिअॅलिटी शोबद्दल माहिती शेअर केलीय. दोन्ही हँडलन्सी म्हटलं की, "प्रणितच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी: तो बिग बॉसच्या घरी परत येतोय." 'बीबी तक'नं 'फिल्मी विंडो'चा हवाला देत ही बातमी ब्रेकिंग न्यूज म्हणून शेअर केली आहे. त्यासोबत लिहिलंय की, तो आज शोमध्ये परत येतोय.
🚨 BREAKING! Pranit More to enter Bigg Boss 19 house today (Via Filmwindow)
— BBTak (@BiggBoss_Tak) November 5, 2025
लोकांनी म्हटलंय की, "King प्रणीत मोरे परत येतोय..."
या बातमीमुळे प्रणीत मोरेच्या चाहत्यांमध्ये आनंदाची लाट उसळली. एका चाहत्यानं म्हटलंय की, "अरे देवा, हे खरोखर घडतंय का? मला खरंच विश्वास बसत नाही. प्रणीत घरी परत येतोय, हे ऐकून मला खूप आनंद झालाय. शेवटी, खरं एन्टरटेन्मेंट आणि खरा आनंद शोमध्ये परतणार आहे. त्याची कॉमेडी शैली, प्रामाणिकपणा आणि टायमिंगची तुलना कुणाशीच होऊ शकत नाही आणि घरातील लोक त्याची आतुरतेनं वाट पाहत आहेत..." एका युजरनं म्हटलंय की, "विनर परत येतोय...' अनेकांनी लिहिलंय की, "King प्रणीत परत येतोय..."
किश्वर मर्चंटच्या ट्वीटवर लोकांनी विचारलेले प्रश्न
दरम्यान, प्रणीत मोरे घरात कॅप्टनं बनल्यानंतर सलमान खाननं सांगितलेलं की, त्याला मेडिकल गेल्पसाठी शोमधून बाहेर यावं लागेल. या वृत्तानं घरात त्याचे मित्र आणि फॅन्स खूपच नाराज झालेले. प्रणीत घराबाहेर गेल्यानंतर घरात त्यांचे मित्र खूप रडताना त्याची आठवण काढताना दिसले. पण, त्यासोबतच प्रणीतचे फॅन्सही भावूक झालेले. काही तासांपूर्वी अभिनेत्री किश्वर मर्चंटनं एक ट्वीट शेअर केलं आणि सांगितलं की, 'ती प्रणीत मोरेला मिस करतेय...'
























