एक्स्प्लोर
BJP On Priyank Kharge : संघावर बंदीची मागणी करणं म्हणजे वैचारिक दारिद्र्य - केशव उपाध्ये
कर्नाटकचे मंत्री प्रियांक खर्गे (Priyank Kharge) यांनी राज्यातील शाळा-कॉलेजे आणि सरकारी जागांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) शाखांवर बंदी घालण्याची मागणी केली आहे, यासाठी त्यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या (Siddaramaiah) यांना पत्र लिहिले आहे. 'आरएसएसच्या (RSS) कार्यक्रमांमुळे तरुण पिढीचे ब्रेन वॉशिंग (brainwashing) होत आहे, जे ना देशासाठी ना समाजासाठी हितकारक आहे,' असा थेट आरोप प्रियांक खर्गे यांनी केला आहे. आरएसएसच्या कार्यक्रमांमुळे मुलांच्या आणि तरुणांच्या मनावर नकारात्मक परिणाम होत असून, संघाची मानसिकता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करण्याची आहे, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे. या मागणीनंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी अधिकाऱ्यांना तपास करून कारवाईचे निर्देश दिले आहेत. दुसरीकडे, भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी प्रियांक खर्गे यांच्या या मागणीवर जोरदार टीका केली आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















