(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Prithviraj Chavan PC | परिवर्तन आघाडी ही भाजपची बी नव्हे तर ए टीम, पृथ्वीराज चव्हाणांची टीका
Prithviraj Chavan PC | परिवर्तन आघाडी ही भाजपची बी नव्हे तर ए टीम, पृथ्वीराज चव्हाणांची टीका
विधान सभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर उद्या नावे जाहीर होण्याची शक्यता आहे.त्या आधी साताऱ्यात आम्ही बैठक घेतली... आम्ही गद्दारीचा पंचनामा म्हणून चार्शिट काढल आहे त्या मध्ये पैसे कशा पद्धतीने काढले गेले फसवा फसवी कशी झाली या बद्दल लिहल आहे. अतुल भोसले हे चौथ्यांदा निवडणूक लढत आहे निवडणूक लढण्याचा खूप अनुभव आहे... मी विधानसभेमध्ये अडाणी बद्दल श्वेतपत्रिकेचे मागणी केली परंतु ती विखे पाटलांनी काढली नाही ते खरं जनतेला सांगू शकत नाहीत... जागा वाटपात काँग्रेसवर अन्याय होईल असं मला वाटत नाही आता आम्हाला चांगला जागा मिळतील आमचे उद्दिष्ट सरकार स्थापन करून या लोकांना घालवणे हे आहे. लाडक्या बहिणी योजनेचा स्वागत आम्ही केल आहे.त्याचा बोजवारा उडू नये अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे... तिन्ही पक्षाचे नेते बसून कोण कुठली जागा लढणार यावर जागावाटप होत असते...उद्या काही नाव तरी जाहीर होतील असं मला वाटतं... कोणाचेही नाव कोणी जाहीर केलं नाही या सर्व मीडियाच्या बातम्या आहेत... काही ठिकाणी भाजपवर नाराज असणाऱ्यांची मते विरोधी पक्षाला पडण्यापेक्षा विभागणी केली पाहिजे अशी भारतीय जनता पक्षाची भूमिका आहे... परिवर्तन आघाडी ही भाजपची बी नव्हे तर ए टीम आहे. फक्त नावच वेगळा आहे... जरांगे सारंगी यांचा वेगळा विचार आहे निर्णय घेतील आम्ही महाविकास आघाडी पूर्ण ताकतीने लढणार आहे... वाढदिवसाच्या फटका कोणाला बसेल हे सांगता येणं आता अवघड आहे.