Prakash Ambedkar : वंचित बहुजन आघाडीची अद्याप मविआसह युतीत नाही, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
Maharashtra News : वंचित बहुजन आघाडीची अद्याप महाविकास आघाडीसोबत पूर्ण युती नाही, त्यामुळे वंचितच्या कार्यकर्त्यांनी इतर पक्षांच्या बैठकीला किंवा कार्यक्रमाला उपस्थित राहू नये, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांचं आवाहन. लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) तारखा कधी जाहीर होणार याकडं अवघ्या देशाचं लक्ष लागून राहिलं आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. महाविकास आघाडीतील (Maha Vikas Aghadi) जागावाटपाबाबतचा तिढा कायम असतांना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिलेल्या प्रस्तावावर अद्याप निर्णय झालेला नाहीये. आता वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी महाराष्ट्रात (Maharashtra News) सभांचा धडाका लावला आहे. मार्चच्या पहिल्याच पंधरवाड्यात प्रकाश आंबेडकरांच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये पाच सभा होणार असून या सभांकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.