एक्स्प्लोर

Uday Samant: उदय सामंतांच्या महत्त्वाकांक्षेला धुमारे कधी फुटले? 'या' कारणामुळे भाजपसाठी ठरतील हुकमी एक्का; सुषमा अंधारेंनी सांगितलं कारण

Uday Samant Shivsena 20 MLAs: शिवसेनेच्या 20 आमदारांचा गट उदय सामंत यांच्यासोबत भाजपमध्ये जाऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप

मुंबई: महायुतीमध्ये पालकमंत्री पदांच्या वाटपावरुन प्रचंड असंतोष निर्माण झाला असतानाच महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक भूकंप होण्याचे संकेत मिळत आहेत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेचे आमदार उदय सामंत कोणत्याही क्षणी भाजपचा हात पकडू शकतात. शिंदे गटातील 20 आमदार त्यांच्यासोबत फुटून बाहेर पडू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. त्यांनी सोमवारी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत यासंदर्भात भाष्य केले.

इंग्रजीत एक म्हण आहे, 'हिस्टरी रिपीटस् इटसेल्फ'. तुम्ही जे पेरता तेच उगवतं, तुम्हाला तेच परत मिळतं. विजय वडेट्टीवारांनी नव्या समीकरणांच्या 'उदया'बाबत केलेले वक्तव्य महत्त्वाचे आहे. या राज्यात महायुतीने ईव्हीएम आणि अन्य गोष्टींची मदत घेऊन सरकार स्थापन केले. त्यानंतर जेव्हा देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार, हे स्पष्ट झाले तेव्हा उपमुख्यमंत्रीपद शिवसेनाला मिळणार, असे सांगण्यात आले. मात्र, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार नाही, अशी चर्चा होती. त्यावेळी पहिल्यांदा उदय सामंत यांना आपण उपमुख्यमंत्री होऊ असे वाटले. आपण उपमुख्यमंत्रीपदाचे दावेदार होऊ शकतो, या त्यांच्या महत्त्वाकांक्षेला तेव्हा धुमारे फुटले होते, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले.

एकनाथ शिंदे भाजपला नकोसे झालेत का?

एकनाथ शिंदे यांचे रुसवे-फुगवे अनेकदा दिसून येतात. भाजपला एकनाथ शिंदे यांचे हे दबावाचे राजकारण रुचलेले नाही. त्यामुळे भाजपला उदय सामंत यांच्यासारखा फ्लेक्सिबल चेहऱ्याची गरज आहे. उदय सामंत आधी राष्ट्रवादी, शिवसेना आणि शेवटी शिंदे गट असा प्रवास करुन झालेले आहेत. त्यामुळे आता चांगली संधी आल्यास ते शिंदे गटाशी फारकत घेऊन चटकन भाजपमध्ये जाऊ शकतात. भाजप निश्चितपणे नव्या समीकरणाचा 'उदय' घडवून आणू शकते. यादृष्टीने आताच्या घडामोडी विचार करायला लावणाऱ्या आहेत, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले.

संजय राऊतांचा खळबळजनक दावा

उदय सामंत हे शिंदे गटातील 20 आमदारांचा गट फोडून भाजपसोबत जाऊ शकतात, असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत केला होता. महायुतीचे सरकार स्थापन करताना एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदासाठी अडून बसले होते. तेव्हा 'उदय' होणार होता. उदय सामंत यांच्यासोबत 20 आमदार आहेत, अशी माझी माहिती असल्याचा दावा राऊतांनी केला होता. तसेच भाजपकडून भविष्यात सगळे पक्ष फोडतील, शिंदे गट देखील फोडतील, अजित पवार गट देखील फोडतील, फोडाफोडी हेच त्यांचे जीवन आणि राजकारण आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले होते.

आणखी वाचा

नव्या 'उदय'चं भाकित, विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा, संजय राऊत म्हणाले शिंदे वेळीच सावध झाले अन् झाकली मूठ....

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
CAG Report: रेल्वे कारभारावर CAGचा गंभीर ठपका! 19, 458 कोटींचा अनधिकृत खर्च, 20 हजारांहून अधिक सुरक्षा कामे रखडली; तर 89 % स्थानकांवर मूलभूत सुविधांचा अभाव
रेल्वे कारभारावर CAGचा गंभीर ठपका! 19, 458 कोटींचा अनधिकृत खर्च, 20 हजारांहून अधिक सुरक्षा कामे रखडली; तर 89 % स्थानकांवर मूलभूत सुविधांचा अभाव
Chandrashekhar Bawankule: भाजपकडून राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाची जबाबदारी मिळताच चंद्रशेखर बावनकुळे आज थेट राजस्थान गाठणार, नेमकं कारण काय?
भाजपकडून राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाची जबाबदारी मिळताच चंद्रशेखर बावनकुळे आज थेट राजस्थान गाठणार, नेमकं कारण काय?
Bhavesh Kaware and Amit Thackeray: भावेश कावरे शिवतीर्थवर आला, सारवासारव करायला लागताच अमित ठाकरे संतापले, एकच वाक्य म्हणाले, 'तुला....'
भावेश कावरे शिवतीर्थवर आला, सारवासारव करायला लागताच अमित ठाकरे संतापले, एकच वाक्य म्हणाले, 'तुला....'

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
Mumbai Railway Local Train: मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
Mukesh Khanna Demands To Remove Jana Gana Mana: 'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
IND vs SL 1st Test DAY-3 Live : आकाशात ढगांची गर्दी अन् विजांचा कडकडाट...! तिसऱ्या दिवशीही टीम इंडियाच्या खेळावर पाणी फिरणार?, जाणून घ्या Live अपडेट्स
आकाशात ढगांची गर्दी अन् विजांचा कडकडाट...! तिसऱ्या दिवशीही टीम इंडियाच्या खेळावर पाणी फिरणार?, जाणून घ्या Live अपडेट्स
Manohar Mama Bhosale Case: भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणाला नवे वळण; दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्यासह तिघं सहआरोपी
भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणाला नवे वळण; दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्यासह तिघं सहआरोपी
Ind vs Sl 1st Test Day-3 Weather Forecast Galle : भारत-श्रीलंका कसोटीवर मोठं संकट; तिसऱ्या दिवशी हवामानाचा नेमका अंदाज काय? गॉलमधून धक्कादायक अपडेट
भारत-श्रीलंका कसोटीवर मोठं संकट; तिसऱ्या दिवशी हवामानाचा नेमका अंदाज काय? गॉलमधून धक्कादायक अपडेट
Chandrashekhar Bawankule: भाजपकडून राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाची जबाबदारी मिळताच चंद्रशेखर बावनकुळे आज थेट राजस्थान गाठणार, नेमकं कारण काय?
भाजपकडून राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाची जबाबदारी मिळताच चंद्रशेखर बावनकुळे आज थेट राजस्थान गाठणार, नेमकं कारण काय?
Nashik Crime News: 'आई लगेच घरी येईल...' सांगून बाबा क्लिनिकला गेले, अन् मागे अनर्थ घडला; दोन सख्ख्या बहिणींचा पाण्याच्या टाकीत पडून दुर्दैवी अंत
'आई लगेच घरी येईल...' सांगून बाबा क्लिनिकला गेले, अन् मागे अनर्थ घडला; दोन सख्ख्या बहिणींचा पाण्याच्या टाकीत पडून दुर्दैवी अंत
Embed widget