(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Political Reaction on Onion : कांदा उत्पादकांची व्यथा आम्ही केंद्रापर्यंत पोहोचवू, मुंडेंचं आश्वासन
केंद्र सरकारने कांद्याचं निर्यातशुल्क वाढवून ते ४० टक्क्यांवर नेलंय. त्यामुळे आता कांद्याच्या निर्यातीत घट होणाऱेय. महत्त्वाचं म्हणजे, पुढील काळात किरकोळ बाजारात कांद्याचे दर कमी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. त्यामुळे ग्राहकराजा आनंदात आहे. मात्र, या निर्णयामुळे मातीत राबणाऱ्या बळीराजाच्या चिंतेत भर पडलीय. कारण, आपल्या कांदा आता परदेशात पाठवताना जास्तीचे शुल्क भरावे लागणारेय, आणि तो कांदा भारतातच विकावा, तर त्याला दरही तुलनेने कमी मिळणारेय. दरम्यान, केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे, अनेक शेतकरी नेते, संघटना आक्रमक झाल्या आहेत. आणि त्यांनी आंदोलनाचे इशारे दिलेयत. तर काही ठिकाणी कांद्याचे लिलावही बंद पाडण्यात आलेत. नाशिक जिल्ह्यातील कांद्याचे सर्व लिलाव बेमुदत काळासाठी बंद करण्यात आलेत. एकूणच, आता एका बाजूला कांदा ग्राहकाला हसवणारेय तर शेतकऱ्याला मात्र रडवण्याची शक्यताय.