एक्स्प्लोर
Ambadas Danve : एकनाथ शिंदे फुसके-रुसके फटाके, राज ठाकरे - उद्धव ठाकरे सुटळी बॉम्ब!
एबीपी माझाच्या 'राजकीय आतषबाजी' कार्यक्रमात ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी दिवाळीच्या फटाक्यांची उपमा देत राजकीय नेत्यांवर जोरदार टीका केली. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पंतप्रधान नरेंद्र मोदी, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यासह अनेक नेत्यांचा समावेश होता. 'एकनाथ शिंदे हे फुसका आणि रुस्का फटाका आहेत, काही झालं की रुसून गावाकडे जातात', असा थेट हल्लाबोल अंबादास दानवे यांनी केला. त्यांनी संदिपान भुमरे यांना 'भुईचक्कर' म्हटले, कारण ते पाचवडच्या बाहेर जात नाहीत. अजित पवारांना केवळ स्वतःपुरती उडणारी 'सुरसुरी' म्हटले, तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना शक्तिशाली 'सुतळी बॉम्ब'ची उपमा दिली. आदित्य आणि अमित ठाकरेंनी आकाशात प्रकाशमान व्हावे यासाठी त्यांना 'रॉकेट' दिले, तर संजय राऊत यांना रोज बॉम्ब फोडणारे 'टायगर बॉम्ब' म्हटले. पंतप्रधान मोदींना 'छोट्या पल्ल्याचा रॉकेट' संबोधले जे योग्य ठिकाणी फुटत नाही.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















