एक्स्प्लोर

Local Train Block: मुंबईच्या चाकरमान्यांसाठी महत्वाची बातमी! मध्य रेल्वेवर 12 दिवसांचा खोळंबा; ट्रेनचे बदलले मार्ग, वेळेत बदल, कुठल्या लोकल रद्द? पाहा सविस्तर

Local Train Block: मुंबईच्या चाकरमान्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याणदरम्यान अप व डाऊन जलद मार्गावर रविवारी सकाळी 10:40 ते दुपारी 3:40 दरम्यान मेगा ब्लॉक असेल.

Local Train Block: मुंबईच्या चाकरमान्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याणदरम्यान अप व डाऊन जलद मार्गावर रविवारी सकाळी 10:40 ते दुपारी 3:40 दरम्यान मेगा ब्लॉक असेल. यावेळी ठाणे ते कल्याण धावणाऱ्या अप आणि डाऊन जलद लोकल पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवर वळवण्यात येणार आहेत. यामुळे काही फेऱ्या रद्द राहणार. तर दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेलदरम्यान ब्लॉक नसेल.अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, बेलापूर ते पनवेलदरम्यान ब्लॉक असणार आहे. सोबतच मध्य रेल्वेवर आजपासून (22 नोव्हेंबर) ते पुढच्या 3 डिसेंबरपर्यत गर्डर उभारण्यासाठी बदलापूर स्टेशन येथे मध्यरात्रीनंतर 2 ते 3.30 पर्यंत ब्लॉक राहणार आहे.

Local Train Block: ब्लॉकमागील नेमकं कारण काय?

बदलापूर स्थानक परिसरात पादचारी पुलाचे गर्डर उभारणीचे काम शनिवारी मध्यरात्रीपासून सुरू होणार आहे. यावेळी 350 मेट्रिक टन क्षमतेची क्रेन पादचारी पुलासाठी 37.2 मीटर लांबीचे 18 स्टील गर्डर उभारण्यात येणार आहे. यासाठी 350 मेट्रिक टन क्षमतेचे क्रेन वापरण्यात येणार आहे. गर्डर उभारणीसाठी शनिवार, 22 नोव्हेंबरपासून ते 3 डिसेंबरपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे.

Mumbai Local Train : शेवटची कर्जत लोकल 11.30 वाजता

दरम्यान या ब्लॉक कालावधीत 12.12ची कर्जत-सीएसएमटी अंबरनाथपर्यंत धावेल. सोबतच कर्जतहून 2.30 वाजेला सुटणारी लोकल अंबरनाथ येथून 3.10 वाजता सीएसएमटीसाठी रखाना होईल. दोन्ही दिशेला ही लोकल अंबरनाथ ते कर्जतदरम्यान रद्द राहील. यामुळे सीएसएमटीतून कर्जतपर्यंत 11.30 वाजाताची कर्जतपर्यंत जाणारी शेवटची लोकल असणार आहे.

Mumbai Local Train  Megablock : कधीपर्यंत असेल विशेष रात्रकालीन ब्लॉक

पनवेल-कळंबोली कोचिंग कॉम्प्लेक्स येथे बांधकामात येणारे यांत्रिक अडथळे हटविण्यासाठी मध्य रेल्वेने 21 नोव्हेंबर ते 2 डिसेंबरदरम्यान विशेष रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार असल्याचे कळवलं आहे. हे ब्लॉक रात्री 1.30 ते 3.30 या कालावधीत घेण्यात येणार आहेत. पनवेल आणि कळंबोलीदरम्यान 3 प्लॅटफॉर्म अप आणि डाऊन मार्गिका, ट्रेन उभ्या करण्यासाठी अप आणि डाऊन मार्गिका तसेच इंजिन वळविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मार्गिकांवरील वापर पूर्णपणे बंद असेल. यासह 20 मेल-एक्स्प्रेस विलंबाने धावतील, अशी देखील माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे घरातून निघतांना अथवा लोकल प्रवास करताना रेल्वेचे नियोजन बघून निघावं, असे आवाहन करण्यात आलं आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur Winter Session 2026: नागपूर ऐवजी हिवाळी अधिवेशन मुंबईतच घ्या अन् 300-400 कोटी दुष्काळग्रस्तांकडे वळवा; अर्थ एनजीओची मागणी; मुख्यमंत्र्यांना 30 ऑक्टोबरची मुदत
नागपूर ऐवजी हिवाळी अधिवेशन मुंबईतच घ्या अन् 300-400 कोटी दुष्काळग्रस्तांकडे वळवा; अर्थ एनजीओची मागणी; मुख्यमंत्र्यांना 30 ऑक्टोबरची मुदत
Mumbai Local Train Central Railway: मुंबई लोकल खोळंब्याचं भयंकर कारण समोर, 5 तासांपासून ट्रेन जागच्या जागी उभ्या, वाहतूक सुरळीत होण्यास रात्र होणार!
मुंबई लोकल खोळंब्याचं भयंकर कारण समोर, वाहतूक सुरळीत होण्यास रात्र होणार, 5 तासांपासून ट्रेन जागेवर उभ्या
Mumbai Local Train Central Railway: मुंबईत लोकल ट्रेनच्या वाहतुकीचा खेळखंडोबा! साडेतीन तास ट्रेन एकाच जागी, बिघाड दुरुस्त करायला आणखी पाच तास लागणार?
मुंबईत लोकल ट्रेनच्या वाहतुकीचा खेळखंडोबा! साडेतीन तास ट्रेन एकाच जागी, बिघाड दुरुस्त करायला आणखी पाच तास लागणार?
Praniti Shinde on Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी म्हणजे अकार्यक्षम नेतृत्व, प्रणिती शिंदेंनी स्वत:च्या नेतृत्त्वाला कोणती उपमा दिली?
देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी म्हणजे अकार्यक्षम नेतृत्व, प्रणिती शिंदेंनी स्वत:च्या नेतृत्त्वाला कोणती उपमा दिली?

व्हिडीओ

Raj Thackeray Speech | दुचाकी, चारचाकी, सिग्नल ते सरकार... नवी मुंबईतील मेळाव्यातलं राज यांचं भाषण!
Mumbai Local CR : ठाणे भांडूपदरम्यान सिग्नल यंत्रनेत बिघाड, मध्य रेल्वे 2 तासांपासून विस्कळीत
NCP Finance Ministry : अर्थखातं राष्ट्रवादी मिळणार? मुख्यमंत्र्यांसोबत काय चर्चा झाली?Special Report
Vivek Padit Majha Katta : आदिवासींच्या हक्कासाठी लढणारे विवेक पंडित माझा कट्ट्यावर
Mann Suddha Tujha Season 3 : गवताची पेंढी | मन सुद्ध तुझं | Episode 4 | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
फुटपाथवर चालता येत नाही ,बागा, चांगली मैदान नाहीत आणि सांगायचं आमचा जीडीपी 7.8 टक्के झालाय; महाराष्ट्राची सत्ता माझ्या हातात कधी देतोय याची वाट पाहतोय, शिस्त लावणं राॅकेट सायन्स नाही : राज ठाकरे
फुटपाथवर चालता येत नाही ,बागा, चांगली मैदान नाहीत आणि सांगायचं आमचा जीडीपी 7.8 टक्के झालाय; महाराष्ट्राची सत्ता माझ्या हातात कधी देतोय याची वाट पाहतोय, शिस्त लावणं राॅकेट सायन्स नाही : राज ठाकरे
Mumbai Local Train Central Railway: मुंबईत लोकल ट्रेनच्या वाहतुकीचा खेळखंडोबा! साडेतीन तास ट्रेन एकाच जागी, बिघाड दुरुस्त करायला आणखी पाच तास लागणार?
मुंबईत लोकल ट्रेनच्या वाहतुकीचा खेळखंडोबा! साडेतीन तास ट्रेन एकाच जागी, बिघाड दुरुस्त करायला आणखी पाच तास लागणार?
Praniti Shinde on Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी म्हणजे अकार्यक्षम नेतृत्व, प्रणिती शिंदेंनी स्वत:च्या नेतृत्त्वाला कोणती उपमा दिली?
देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी म्हणजे अकार्यक्षम नेतृत्व, प्रणिती शिंदेंनी स्वत:च्या नेतृत्त्वाला कोणती उपमा दिली?
हैदराबादमध्ये आतापासून भीषण पाणीटंचाई, टँकरच्या मागणीत 233 टक्क्यांनी वाढ; 20 हजार बोअरवेल कोरड्या पडल्या, बसर विद्यापीठात ऑनलाइन क्लास होणार
हैदराबादमध्ये आतापासून भीषण पाणीटंचाई, टँकरच्या मागणीत 233 टक्क्यांनी वाढ; 20 हजार बोअरवेल कोरड्या पडल्या, बसर विद्यापीठात ऑनलाइन क्लास होणार
राहुल गांधींच्या ताफ्यातील वाहने उत्तर प्रदेशातील पूर्वांचल एक्स्प्रेसवेवर एकमेकांवर आदळली; सुलतानपूर न्यायालयात हजर राहण्यासाठी जात असतानाच घटना
राहुल गांधींच्या ताफ्यातील वाहने उत्तर प्रदेशातील पूर्वांचल एक्स्प्रेसवेवर एकमेकांवर आदळली; सुलतानपूर न्यायालयात हजर राहण्यासाठी जात असतानाच घटना
एल निनो, पाऊस कमी म्हणून सांगता अन् पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवून निसर्ग उद्ध्वस्त करणारे प्रकल्प महाराष्ट्रात आणताय; सतेज पाटलांचा हल्लाबोल
एल निनो, पाऊस कमी म्हणून सांगता अन् पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवून निसर्ग उद्ध्वस्त करणारे प्रकल्प महाराष्ट्रात आणताय; सतेज पाटलांचा हल्लाबोल
Mumbai Local Train Central Railway: मुंबई लोकल खोळंब्याचं भयंकर कारण समोर, 5 तासांपासून ट्रेन जागच्या जागी उभ्या, वाहतूक सुरळीत होण्यास रात्र होणार!
मुंबई लोकल खोळंब्याचं भयंकर कारण समोर, 5 तासांपासून ट्रेन जागच्या जागी उभ्या, वाहतूक सुरळीत होण्यास रात्र होणार!
Abhay Oka: निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीमध्ये राजकीय वर्चस्व नको; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अभय ओक यांचे स्पष्ट मत, लालकृष्ण अडवाणींच्या 'त्या' वक्तव्यांची करुन दिली आठवण
निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीमध्ये राजकीय वर्चस्व नको; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अभय ओक यांचे स्पष्ट मत, लालकृष्ण अडवाणींच्या 'त्या' वक्तव्यांची करुन दिली आठवण
Embed widget