Petrol Diesel Price : सणासुदीच्या काळात इंधन दरांत विक्रमी वाढ, परभणीत पेट्रोल 120 रुपये प्रतिलिटर
Price of Petrol & Diesel in India : भारतात पेट्रोल-डिझेलच्या किमतींनी उच्चांक गाठला आहे. आज वसुबारस, दिवाळीचा पहिला दिवा. तसेच 1 नोव्हेंबर, महिन्याचा पहिला दिवस. आजच्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. आज देशात पेट्रोल 35 पैशांनी आणि डिझेल 35 पैशांनी महागलं आहे. मुंबईमध्येही पेट्रोलच्या किमतीत विक्रमी वाढ झाली आहे. मुंबईत एक लिटर पेट्रोलसाठी 115 रुपये मोजावे लागणार आहे. तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, जर सरकारनं वेळीच योग्य पावलं उचलली नाहीत, तर मात्र लवकरच पेट्रोलचे दर 120 पार पोहोचतील. दरम्यान, कच्च्या तेलाचं उत्पादन करणाऱ्या संघटना OPEC+ या आठवड्यात संयुक्त बैठक घेणार आहेत. या बैठकीत उत्पादन वाढवण्यावर निर्णय होऊ शकतो. जर असं झालं तर किमतींमध्ये घट होऊ शकते. दरम्यान, भारतात गरजेच्या 80 टक्के कच्चं तेल परदेशातून खरेदी केलं जातं.
मुंबईत पेट्रोलची किंमत 115.50 रुपये आणि डिझेलची किंमत 106.62 रुपये प्रति लिटर आहे. अशातच कोलकातामध्ये पट्रोल आता 110.15 आणि डिझेल 101.56 रुपये प्रति लिटर आहे. याव्यतिरिक्त चेन्नईमध्ये एक लिटर पेट्रोलचे दर 106.35 रुपये आणि डिझेल 102.59 रुपये प्रति लिटर आहे. तर देशाची राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत आता 109.69 रुपये आणि डिझेलची किंमत 98.42 रुपये प्रति लिटर इतकी झाली आहे.
महाराष्ट्रातही पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. मुंबईत पेट्रोलनं 115चा आकडा गाठला असून डिझेलही 105 रुपयांच्या पार पोहोचलं आहे. मुंबईत पेट्रोलची किंमत 115.50 रुपये आणि डिझेलची किंमत 106.62 रुपये प्रति लिटर आहे. तर