Palghar Murbe | मच्छिमाराच्या जाळ्यात दीड कोटींचा 'घोळ'! मुरबे येथील मच्छिमाराचे नशिब फळफळले
पालघर : मासेमारीच्या हंगामात मच्छिमारांसाठी रोजचा दिवस सारखा नसतो. कधी मासेमारी चांगली झाली तर भरपूर कमाई आणि हाती काहीच लागले नाही तर शून्य कमाई. पण मुरबे गावातील मच्छिमार चंद्रकांत तरे यांचे नशीब एका रात्रीत फळफळले. त्यांच्या बोटीच्या जाळ्याला लागलेले मासे विकून दीड कोटीहुन अधिकची कमाई झाली आहे. पालघरच्या समुद्रात मासेमारी दरम्यान हा चमत्कार झाला आहे. सोमवारी व्यापाऱ्यांनी दीड कोटींची बोली लावून घोळ मासे खरेदी केले. त्यामुळे पुन्हा एकदा मुरबे गाव प्रकाश झोतात आले आहे. यापूर्वी याच गावातील श्री साई लक्ष्मी या बोट मालकाच्या जाळ्यात घोळ मासा अडकला होता. त्यामधील बोताची किंमत साडे पाच लाखाहून अधिक होती.


















