Kalyan Dombivli News : केडीएमसीच्या अत्रे रंगमंदिरात मध्यरात्री प्रेक्षकांनी घातला गोंधळ; पोलीस अन् एफडीएच्या कारवाईकडे लक्ष, नेमकं प्रकरण काय?
Kalyan Dombivli Crime : कल्याण डोंबिवली महानगरपालिका नाट्यगृह नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असतं. अशातच गुजराती नाटक बघण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांनी मध्यरात्री गोंधळ घातल्याचा प्रकार घडला आहे.

Kalyan Dombivli Crime News :कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (Kalyan Dombivli Municipal Corporation) नाट्यगृह नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असतं. अशातच कल्याण मधील आचार्य अत्रे नाट्यगृहात एक गुजराती नाटक सुरू असताना नाटकाचा मध्यंतर झाल्यावर प्रेक्षक नाट्यगृहातील उपहार गृहात नाष्टा करण्यासाठी गेले, त्यावेळी काही प्रेक्षकांनी कोल्डड्रिंक्स पिण्यासाठी घेतले. यात काही लहान मुलांचाही समावेश होता.
दरम्यान, कोल्डड्रिंक्स पित असताना काही प्रेक्षकांनी त्यावरील एक्सपायरी डेट पाहिली असता धक्कादायक प्रकार उघडकीस आला. यात सगळ्या कोल्डड्रिंक्स बाटल्या या एक्सपायरी डेट असल्याचे उघड झाले. तर फ्रिजमध्ये असलेल्या संपूर्ण कोल्डड्रिंक्स बाटल्या या एक्सपायरी डेटच्या निघाल्या.त्यामुळे संतापलेल्या प्रेक्षकांनी गोंधळ (Kalyan Dombivli Crime) घालत उपहार गृह चालकाला जाब विचारला आणि उपहार गृह चालकाने चूक मान्य करत मी एक्सपायरी डेट पाहिली नसल्याचे सांगत चूक मान्य केलीय. मात्र संतापलेल्या प्रेक्षकांनी पोलिसांना बोलवून हा धक्कादायक प्रकार (Crime) उघडकीस आणला.कल्याण बाजारपेठ पोलिसांनी कोल्डड्रिंक्स एक्सपायरी डेट असलेल्या बाटल्या जप्त केल्या असून आता पोलिसांसह अन्न आणि औषध प्रशासनाकडून या प्रकरणी काय कारवाई केली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र या प्रकरणामुळे काही काळ तणाव बघायला मिळाला.
ग्रामसभेत दोन गट एकमेकांत भिडले, गावांच्या समक्ष दोन गटात हाणामारी
नांदेडच्या कंधार तालुक्यातील हाळदा गावात ग्रामसभा सुरू असताना दोन गट एकमेकांत भिडले. यावेळी गावातील दोन गटात चांगलीच हाणामारी देखील झाली. काही सुज्ञ गावकऱ्यांनी दोन्ही गटाला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र दोन्ही गट ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यातून हाणामारीत चार जण चांगलेच जखमी झालेयत. ग्रामपंचायतीच्या निवडणुका आता जवळ आल्याने गावागावात वादविवाद वाढले असून त्यातून हाणामारी होण्यापर्यंत प्रकार वाढले आहेत. हाळदा इथल्या या हाणामारीच्या घटनेचे व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
ही बातमी वाचा:
























